बंगलोर ( कर्नाटक ) : भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत, यापैकी एका रूग्णाचा प्रवासाची माहिती उपलब्ध आहे. तर दुसऱ्या रूग्णाची माहित उपलब्ध नाही आहे. KIA बंगलोर विमानतळावर त्याचा कोरोनाचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर पहिला रुग्ण हा भारत सोडून अहवालासह दुबईला गेल्याची ( Omicron 1 Patient travelled to Dubai ) माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका हॉटेलमध्ये त्याची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी तो पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्याला हॉटेलमध्येच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्याची BBMP द्वारे जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले होते. दरम्यान त्याचा काल ओमायक्रॉनचा ऋअहवाल पॉझिटिव्ह ( Omicron Patient Left India ) आला आहे.
जाणून घ्या त्या पहिल्या रुग्णाचा प्रवास -
1. कोरोनाचा नकारात्मक अहवालासह पहिला रुग्ण हा दुबईमार्गे भारतात 20 नोव्हेंबर रोजी आला होता. त्याची KIA बंगलोर येथे तपासणी व चाचणी करण्यात आली यावेळी त्याचा अहवाल नकारात्मक आला होता.
2. त्याच्या आगमनानंतर त्याची त्याच दिवशी एका हॉटेलमध्ये पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तो पॉझिटिव्ह आढळून आला.
3. येथील UPHC डॉक्टरांनी त्याच्या शारीरिक चाचणीसाठी हॉटेलला भेट दिली आणि त्याला कोणतेही लक्षणे नसताना आढळले होते. त्याला हॉटेलमध्ये स्वत: ला विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
4. 22 नोव्हेंबर रोजी त्याचे चाचणीचे नमुने हे BBMP द्वारे जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
5. दरम्यान, त्या रुग्णाने 23 नोव्हेंबर रोजी केलेली स्वतःची खाजगी रुग्णालयात केलीली कोरोना चाचणी नकारात्मक आली होती.
6. त्याच्या संपर्कात आलेल्या 24 जणांना कोणतेही परिणाम आढळलेले नाहीत. तर त्याचे कोरोना अहवालही नकारात्मक आलेले आहेत.
7. 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी येथील UPHC च्या टीमने येथील 240 दुय्यम संपर्कांतील लोकांची तपासणी केली, मात्र त्यांचेही अहवाल नकारात्मक आलेले आहेत.
8. दरम्यान, त्या रुग्णाने 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडे बारा वाजता बंगलोर विमानतळावर चेक आउट केले आणि तो भारतातून दुबईला परतला.
9. दरम्यान, त्याचा काल ( दि. 2 डिसेंबर ) ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
हेही वाचा - Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण