ETV Bharat / bharat

Om Prakash chautala Jail : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल

उल्लेखनीय आहे की 21 मे रोजी सीबीआय न्यायालयाने चौटाला यांना या प्रकरणी दोषी ( op chautala sentenced to 4 years )  ठरवले होते . त्यानंतर गुरुवारी कोर्टात चौटाला यांच्या शिक्षेबाबत न्यायालयात युक्तीवाद झाला. चौटाला यांच्या वतीने ९० टक्के अपंगत्व आणि आजारांचा दाखला देत न्यायालयाला नम्रतेचे आवाहन करण्यात आले. तर सीबीआयने चौटाला यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

author img

By

Published : May 27, 2022, 3:14 PM IST

Updated : May 27, 2022, 4:46 PM IST

ओम प्रकाश चौटाला
ओम प्रकाश चौटाला

नवी दिल्ली - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना सीबीआय कोर्टाने ( om prakash chautala convicted ) 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शिक्षा जाहीर केली. याशिवाय न्यायालयाने चौटाला यांना ५० लाखांचा ( Om Prakash Chautla )दंडही ठोठावला आहे. ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे ( Om Prakash Chautala sentenced to four years ) आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

उल्लेखनीय आहे की 21 मे रोजी सीबीआय न्यायालयाने चौटाला यांना या प्रकरणी दोषी ( op chautala sentenced to 4 years ) ठरवले होते . त्यानंतर गुरुवारी कोर्टात चौटाला यांच्या शिक्षेबाबत न्यायालयात युक्तीवाद झाला. चौटाला यांच्या वतीने ९० टक्के अपंगत्व आणि आजारांचा दाखला देत न्यायालयाला नम्रतेचे आवाहन करण्यात आले. तर सीबीआयने चौटाला यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

गेल्यावर्षीच तुरुंगातून झाली होती सुटका-87 वर्षीय ओम प्रकाश चौटाला यांना गेल्या वर्षी हरियाणातील जेबीटी भरती घोटाळ्यात शिक्षा भोगल्यानंतर तिहार तुरुंगातून सोडण्यात आले होते. आता ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा-Gyanvapi Dispute : ज्ञानवापी प्रकरणी अंजुमन इंतजामिया समितीविरोधात तक्रार

हेही वाचा-Share Market India: शेअर बाजाराने पुन्हा उसळी घेतली; गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत

हेही वाचा-फरार मारेकऱ्याने फेसबुकवर टाकला सेल्फी, पाच वर्षांनंतर पोलिसांनी पकडले

Last Updated : May 27, 2022, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.