ETV Bharat / bharat

मायनिंग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला चार वर्षे कारावास

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील ओबुलापुरम मायनिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास रेड्डी यांना कंपनीतील अनियमिततेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने ( Anantapur District Court ) चार वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

author img

By

Published : May 21, 2022, 10:39 PM IST

कोर्ट
कोर्ट

अमरावती (आंध्र प्रदेश) - ओबुलापुरम मायनिंग कंपनीचे ( OMC ) व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अनंतपूर जिल्हा न्यायालयाने ( Anantapur District Court ) कंपनीतील अनियमिततेप्रकरणी चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2008 मध्ये, OMC ऑपरेटर ओबुलापुरम परिसरात परवान्यापेक्षा जास्त लोह खनिज वाहून नेत असल्याची तक्रार मिळाली होती. यानंतर जिल्हा वनाधिकारी कल्लोल बिस्वास यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्या ठिकाणी रेड्डी यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.

बिस्वास यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर तपासादरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी बिस्वास यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास अनेक वर्षांपासून सुरू होता. तपासात साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने श्रीनिवास रेड्डी यांना दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना चार वर्षे एक महिन्याची शिक्षा सुनावली. यासह तीन कलमांतर्गत 8 हजार 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. श्रीनिवास रेड्डी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकतात, असे बोलले जात आहे.

हेही वाचा - Soldier Honey Trap Case : पाक गुप्तचर संस्थेला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या जवानाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.