नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गुरवारी राज्यात प्रचार सभा घेतल्या. निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर दिल्लीला निघालेल्या ओवेसी यांच्या वाहनावर तीन-चार राऊंड गोळीबार ( BULLETS FIRING ON OWAISI VEHICLE ) करण्यात आल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर असदुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने Z श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर किठौर येथील छजरासी टोल प्लाझाजवळ दोन जणांनी गोळीबार केला ( Bullets Fired On Owaisi Vehicle ) केला. या हल्ल्यातील दोन्ही आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यातील आरोपी सचिन पंडित आणि शुभम या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यातील सचिन हा कायद्याचा विद्यार्थी असून, तो भाजपा पक्षाचा सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी सचिन पंडित हा ग्रेटर नोएडातील बदलपूर भागातील रहिवासी आहे. तर दुसरा आरोपी हा शुभम हा सहारनपूरचा रहिवासी आहे.
असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार आरोपींनी केला. मात्र, गोळ्या या टायरावर लागल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे सोडून पळून गेले. या हल्ल्यानंतर ओवेसींनी ट्विटरवर गाडीवर पडलेल्या बुलेट होलचा फोटो शेअर करत हल्ल्याची माहिती दिली.
हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसींनी केली 'ही' मागणी -
माझ्यावर झालेल्या या हल्ल्याची स्वतंत्र्य स्वरूपाने चौकशी व्हावी आणि निवडणूक आयोगाने यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. एखाद्या पार्टीच्या प्रमुखावर आशाप्रकारे दोन जण येऊन गोळीबार करत असतील, तर ते बरोबर नाही. उत्तरप्रदेशमध्ये भिती निर्माण करण्याचे काम काही पक्षाकडून सुरू आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही. आम्ही मोठ्या ताकदीने लढू, असे माध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं.
हेही वाचा - Bullets Fired On Owaisi Vehicle : दोन जणांनी माझ्या कारवर तीन-चार राऊंड गोळीबार केला - असदुद्दीन ओवेसी