ETV Bharat / bharat

PFI Operation : एकही गोळी न चालवता पीएफआयचा खेळ संपला; जाणून घ्या, कसा बनवला ऑपरेशनचा प्लॅन

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखालील ( NSA Ajit Doval Massive Action Plan on PFI ) पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाने 2 सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर व्यापक कृती योजना सुरू केली. डोवाल यांनी केरळ आणि महाराष्ट्र पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार ( Doval Meetings with Officers of Maharashtra Police ) संपूर्ण योजनेची आखणी केली.

Massive Action on PFI
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून पीएफआयवर कारवाई
author img

By

Published : Sep 24, 2022, 9:28 AM IST

नवी दिल्ली : 2 सप्टेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा कोची येथे ( PM Narendra Modi Attending an Event on Board INS ) आयएनएस ( INS ) विक्रांतच्या एका कार्यक्रमात सहभागी होत असताना, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांची सुरक्षा टीम केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चे संपूर्ण नेटवर्क उखडून ( NSA Ajit Doval Massive Action Plan on PFI ) टाकण्याचा विचार करीत होते. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, विमानवाहू युद्धनौका सुरू करण्यासाठी कोचीच्या भेटीदरम्यान केरळमधील पोलिस अधिकाऱ्यांसोबत ( Doval Meetings with Officers of Kerala Police ) अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये पीएफआयवर कारवाई करण्याचे नियोजन ( Doval Meetings with Officers of Maharashtra Police ) करण्यात आले.

महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत झाल्या गुप्त बैठका : कोचीहून अजित डोवाल यांनी मुंबईत जाऊन याच मुद्द्यावर महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची गव्हर्नर हाऊसमध्ये बैठक घेतली. या भेटींची गुप्तता डोवाल यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. एनएसएच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, या बैठकीदरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यापूर्वी किंवा उरी सर्जिकल स्ट्राइकपूर्वी जी गुप्तता पाळण्यात आली होती तीच गुप्तता पाळण्यात आली होती. तीन-चार महिन्यांपूर्वी इस्लामिक नेत्यांशी सल्लामसलत करून ही योजना तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून एनएसए डोवाल यांनी संपूर्ण योजना गुप्त ठेवली.

या मोहिमेत दहा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी केले एकत्रित काम : 22 सप्टेंबर रोजी म्हणजेच ज्या दिवशी NIA ने PFI च्या कार्यालयावर आणि देशातील 10 राज्यांमध्ये एकाच वेळी त्यांच्या कामगारांच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) 200 हून अधिक अधिकारी, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी तसेच किमान दहा राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी एकत्र काम केले. 15 हून अधिक राज्यांमध्ये 150 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि 106 PFI नेते आणि सदस्यांना अटक करण्यात आली.

पीएफआयच्या दहशतवादी कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी विमानेसुद्धा उपलब्ध : सूत्रांनी सांगितले की, पीएफआयच्या दहशतवादी कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना चौकशीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आणण्यासाठी विमानेही वेळेत तयार ठेवण्यात आली होती. एनएसएचे अजित डोवाल 24x7 तास ऑपरेशनचे निरीक्षण करीत होते आणि राज्यांशी समन्वय साधत होते. संपूर्ण कारवाईदरम्यान एकही गोळी झाडली गेली नाही हे लक्षात घेण्यासारखे असल्याचे सूत्रांनी सांगितले. एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, दहशतवादी गटांविरुद्ध अशा आणखी कारवाया केल्या जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.