ETV Bharat / bharat

Padma Awards 25 सप्टेंबरपर्यंत करता येणार नामांकन

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाला देण्यात येतात. पद्मपुरस्काराकरिता सरकारी वेबसाईटवर नामांकन किंवा शिफारशी करता येणार आहे.

Padma Awards
पद्म पुरस्कार
author img

By

Published : Jul 14, 2021, 8:52 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांना लोकांच्या पद्म पुरस्कारात बदलण्याकरिता वचनबद्धता दर्शविली आहे. लोकांना पद्म पुरस्काराकरिता 15 सप्टेंबरपर्यंत शिफारशी करता येणार आहेत. तसेच पद्म पुरस्काराकरिता स्वत:चे नामांकन करता येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाला देण्यात येतात. पद्मपुरस्काराकरिता सरकारी वेबसाईटवर नामांकन किंवा शिफारशी करता येणार आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका...एम्सकडून तयारी सुरू

नामांकन व शिफारशीमध्ये संबंधित व्यक्तीची माहिती पद्म पोर्टलमध्ये द्यावी लागणार आहे. सरकारी कंपन्या आणि डॉक्टर वगळता सर्व व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी पात्र आहेत. तर पद्म पुरस्काराकरिता वंश, हुद्दा, पद, लिंग असा कोणताही भेदभाव नाही.

हेही वाचा-DA hike केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ!

भाजपशी संबंधित लोकांनाच पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा आरोप-

पद्म पुरस्कार सन्मानासाठी गतवर्षी राज्याकडून 99 लोकांची शिफारस करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून त्या नावांचा विचार केला गेला नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला होता. तसेच केंद्राशी जवळीक असणाऱ्यांना पद्म पुरस्कार देण्यात आला, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला होता. केंद्राने देशातील विविध क्षेत्रातील नामवंत 119 व्यक्तींना पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. राज्यसरकारने शिफारस केलेल्या पैकी केवळ सिंधुताई सपकाळ यांनाच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा-पीयूष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी निवड

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने 2021 सन्मानित व्यक्ती

  1. कवी नामदेव चंद्रभान कांबळे, पद्मश्री (साहित्य)
  2. रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार)
  3. परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला)
  4. जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय)
  5. गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम)
  6. सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.