ETV Bharat / bharat

Maritime Theatre Command : 'मेरीटाईम थिएटर कमांड'च्या निर्मितीवर महत्त्वपूर्ण बैठक, 9 कमांडर-इन-चीफचा सहभाग - Integrated Theatre Commands

भारतीय सशस्त्र दलांसाठी ( Indian Armed Forces ) एकात्मिक थिएटर कमांड्सच्या निर्मितीसाठी ( creation of Integrated Theatre Commands ) कार्यपद्धती आणि संरचनात्मक फ्रेमवर्कवर त्रि-सेवा चर्चासत्र मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात मेरीटाईम थिएटर कमांडच्या निर्मितीवर चर्चा झाली. यात 9 कमांडर-इन-चीफचा सहभाग होता.

मेरीटाईम थिएटर कमांड
Maritime Theatre Command
author img

By

Published : Feb 26, 2022, 7:49 AM IST

मुंबई - मेरीटाईम थिएटर कमांडच्या ( Maritime Theatre Command ) निर्मितीबाबत सैन्य दलाची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली. एकात्मिक सागरी थिएटर कमांडच्या स्थापनेशी ( creation of maritime theatre command ) संबंधित विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाच्या एकूण 9 कमांडर-इन-चीफनी भाग घेतला, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. 24 ते 25 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत ही बैठक झाली.

भारतीय सशस्त्र दलांसाठी 'एकात्मिक थिएटर कमांड'निर्मिती करण्यात येत आहे. भारतीय सशस्त्र दलांसाठी 'एकात्मिक थिएटर कमांड'निर्मितीसाठी (Integrated तिन्ही सेवांमध्ये एकत्रिकरण आणि संघटनात्मक समन्वय वाढवण्याच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे. सध्या लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन सेनादलांचे आपापले स्वतंत्र विभाग आहेत. त्यांची एकूण संख्या सतरा आहे. आता ते वेगवेगळे न ठेवता तिन्ही सेनादलांचे मिळून एकात्मिक असे विभाग स्थापन करायचे अशी ही ढोबळमानाने संकल्पना आहे.

युद्धाचे डावपेच बदलल आहेत. या बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच भारतात 'थिएटर कमांड' ही संकल्पना अस्तित्वात येत आहे. बहुतेक देशांनी अशी 'थिएटर कमांड' प्रणाली कित्येक वर्षांपूर्वीच अंगीकारली आहे. चीननेही दहा वर्षांपूर्वी ही संकल्पना अंगीकारली. भारतानेही ही प्रणाली राबववावी, हा विचार बराच काळ चर्चेत होता. कोणत्याही युद्धात 17 कमांड एकत्र लढाई लढू शकत नाहीत. त्यामुळे एकात्मिक थिएटर कमांडची गरज आहे. तिन्ही विभागांचा मिळून एक तळ म्हणजे एक ‘थिएटर’ असे या संकल्पनेचे स्थूल स्वरूप आहे.

हेही वाचा - Russia Ukraine Crisis Live Updates : युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू; मोदी-पुतिनमध्ये चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.