ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

देशासह राज्यातील खालील घडामोडींवर आज खास नजर असणार आहे. विविध क्षेत्रासंदर्भातल्या या सर्व घडामोडी आहेत.

newstoday 10 july 2021
NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर
author img

By

Published : Jul 10, 2021, 6:57 AM IST

देशातील या भागात पावसाची शक्यता

newstoday 10 july 2021
देशातील या भागात पावसाची शक्यता

हवेच्या प्रभावामुळे दक्षिण-पश्चिम मान्सून आज पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम-उत्तरप्रदेशच्या उरलेल्या काही भागांसोबतच दिल्ली पोहोचण्याची शक्यता आहे.

गुजरात राज्यातील ८ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू

newstoday 10 july 2021
नाईट कर्फ्यू

गुजरात राज्यातील आठ शहरामंध्ये आजपासून नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, भावनगर, जामनगर, जुनागड आणि गांधीनगर, या शहरांचा यात समावेश आहे. 20 जुलैपर्यंत हा नाईट कर्फ्यू असणार आहे.

सिम्बायोसिस पदवी प्रवेश परीक्षा आजपासून

newstoday 10 july 2021
प्रवेश परीक्षा

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (डीम्ड) विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 13 जुलैपर्यंत चालणार आहे. या परिक्षे संबंधातील हॉल तिकीट संबंधित वेबसाईटवर अपलोड केले गेले आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या जॉर्जिय दौऱ्याचा दुसरा दिवस

newstoday 10 july 2021
एस. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या जॉर्जिय दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. जॉर्जियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री डेविड झलकालीयानी यांच्या निमंत्रणावरुन ते जॉर्जियाला भेट देत आहेत.

श्रीनगरमध्ये राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाणार

newstoday 10 july 2021
लोक अदालत

श्रीनगरमध्ये आज राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाणार आहे. मुमिनाबाद श्रीनगच्या जिल्हा न्यायालयाच्या कॉम्प्लेक्स मध्ये ही अदालत आयोजित केली जाणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा आज जन्मदिवस

newstoday 10 july 2021
राजनाथ सिंह

देशाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांचा जन्म 10 जुलै 1951 मध्ये झाला होता. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात अनेक महत्त्वांच्या पदांवर केले आहे. ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी पदभार स्वीकारला होता. तसेच संरक्षमंत्री होण्याआधी त्यांनी मोदी सरकारच्या आधीच्य मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.

माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस

newstoday 10 july 2021
सुनील गावस्कर

माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1949 मध्ये झाला आहे. भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा १० हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. त्यानी १२५ कसोटीत ३४ कसोटी शतकासह १० हजार १२२ धावा कुटल्यात. ज्या काळात गोलंदाजांचा दबदबा होता त्याकाळात त्यांनी फलंदाज म्हणून स्वत: जगभर धाक निर्माण केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.