ETV Bharat / bharat

T20 World Cup : न्यूझिलंड विरूद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेचा पराभव, वाचा सविस्तर - ग्लेन फिलिप्सने

विश्वचषकातील ( T20 World Cup ) न्यूझिलंड विरूद्ध श्रीलंका या सामन्यात श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव झाला ( New Zealand beat Sri Lanka by 65 runs ) आहे. ग्लेन फिलिप्सने या स्पर्धेतील दुसरे शतक झळकावल्याने न्यूझीलंडने शनिवारी येथे झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली. सामन्याच्या सुरूवातीला न्यूझीलंडची सुरूवात अडखळती होती.या खराब सुरूवातीपासून संघाला सावरत फिलिप्सने 64 चेंडूत 104 धावा करत श्रीलंकेसमोर 7 बाद 167 धावांचे आव्हानात्मक आव्हान उभे केले.धावांचा पाठलाग करताना मात्र श्रीलंकेला अपयश आले.

T20 World Cup
न्यूझिलंड विरूद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेचा पराभव
author img

By

Published : Oct 29, 2022, 8:46 PM IST

सिडनी : विश्वचषकातील ( T20 World Cup ) न्यूझिलंड विरूद्ध श्रीलंका या सामन्यात श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव झाला ( New Zealand beat Sri Lanka by 65 runs ) आहे. ग्लेन फिलिप्सने या स्पर्धेतील दुसरे शतक झळकावल्याने न्यूझीलंडने शनिवारी येथे झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली. सामन्याच्या सुरूवातीला न्यूझीलंडची सुरूवात अडखळती होती.या खराब सुरूवातीपासून संघाला सावरत फिलिप्सने 64 चेंडूत 104 धावा करत श्रीलंकेसमोर 7 बाद 167 धावांचे आव्हानात्मक आव्हान उभे केले.धावांचा पाठलाग करताना मात्र श्रीलंकेला अपयश आले.

डाव सावरत केली मोठी भागिदारी - ग्लेन फिलिप्सने डॅरिल मिचेल (22) सोबत चौथ्या विकेटसाठी 84 धावा करत आपला डाव सावरला. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या गोलंदाजी दरम्यान कसून रजिथा (2/23) यांनी दोन विकेट घेतल्या, तर वानिंदू हसरंगा (1/22), धनंजया डी सिल्वा (1/14), महेश थेक्षाना (1/35) आणि लाहिरू कुमारा (1/37) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

गोलंदाजांचा अचूक मारा - श्रीलंका धावांचा पाठलाग करत असताना अपयश आले.न्युझिलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विजय मिळवून दिला आहे. धावांचा बचाव करताना ट्रेंट बोल्ट (4/13), मिचेल सँटनर (2/21) आणि ईश सोधी (2/21) आपले याेगदान दिले आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा डाव 102 धावांवर संपुष्टात आणला.

संक्षिप्त धावफलक -

न्यूझीलंड : 20 षटकांत 7 बाद 167 (ग्लेन फिलिप्स 104; कसून राजिथा 2/23).

श्रीलंका : (दासुन शनाका 35, भानुका राजपक्षे 34; ट्रेंट बोल्ट 4/13).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.