मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) टी20 विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण ( Team India New Jersey Launch ) केले. टी-20 विश्वचषकापूर्वी, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान हीच जर्सी परिधान करेल. यापूर्वी, बोर्डाने सूचित केले होते की भारतीय संघाची नवीन जर्सी भारताच्या अधिकृत किट प्रायोजक एमपीएल ( Kit sponsor MPL )द्वारे लवकरच लॉन्च केली जाईल. याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचे अधिकृत किट प्रायोजक MPL स्पोर्ट्स यांनी रविवारी भारतीय पुरुष आणि महिला टी-20 संघांसाठी जर्सी लाँच केल्या. भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच, जर्सीचे अनावरण राष्ट्रीय संघाने नाही तर मुंबईच्या अंडर-19 महिला क्रिकेटपटूंसह खेळाच्या काही 'सुपरफॅन्स'ने केले.
-
To every cricket fan out there, this one’s for you.
— BCCI (@BCCI) September 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Presenting the all new T20 Jersey - One Blue Jersey by @mpl_sport. #HarFanKiJersey#TeamIndia #MPLSports #CricketFandom pic.twitter.com/3VVro2TgTT
">To every cricket fan out there, this one’s for you.
— BCCI (@BCCI) September 18, 2022
Presenting the all new T20 Jersey - One Blue Jersey by @mpl_sport. #HarFanKiJersey#TeamIndia #MPLSports #CricketFandom pic.twitter.com/3VVro2TgTTTo every cricket fan out there, this one’s for you.
— BCCI (@BCCI) September 18, 2022
Presenting the all new T20 Jersey - One Blue Jersey by @mpl_sport. #HarFanKiJersey#TeamIndia #MPLSports #CricketFandom pic.twitter.com/3VVro2TgTT
अशी आहे टीम इंडियाची नवीन जर्सी ( Team India New Jersey ) -
टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची जर्सी नेव्ही ब्लू होती, पण यावेळी जर्सीचा रंग आकाशी निळा असून दोन्ही खांद्याजवळचा रंग गडद निळा आहे. भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी समान जर्सी लाँच करण्यात आली आहे. गेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लीग स्टेजच्या पलीकडे प्रगती करू शकली नाही. पण यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील नव्या जर्सीसह नवी आशा निर्माण झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ परिधान करणार नवीन जर्सी -
टी-20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) पूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs AUS T20 Series ) खेळायची आहे, जी 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार असून त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. टी-20 विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची आधीच घोषणा करण्यात आली असून चार खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारताला 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला साखळी सामना खेळायचा आहे. यावेळी टीम इंडियाला ब गटात ठेवण्यात आले आहे.