नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसचा दुप्पट वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे जे आकडे समोर आले आहेत, ते भयावह आहेत. देशात एकाच दिवसात 1 लाख 17 हजार 100 नवे कोरोना रुग्ण ( corona cases in india ) आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या ही 3,52,26,386 झाली आहे. तर ओमायक्रॉनच्या रुग्णमध्येही भारतात वाढ ( omicron cases increased in india ) होत आहे. आतापर्यंत देशभरात 3 हजार 7 नवे रुग्ण ( corona new variant omicron ) आढळले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भारतातील कोरोनाची आकडेवारी -
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण अनुक्रमे 876 आणि 465 आढळून आले आहे. ओमायक्रॉनच्या 3007 रुग्णांपैकी 1199 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड-19 च्या एक दिवसात 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाने 4,83,178 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाच्या उपचाराधिन असलेल्या रुग्णांची संख्या ( active cases of corona in india ) ही 3,71,363 झाली आहे.
बरे झालेले रुग्ण -
आतापर्यंत मागील 24 तासांत 30,836 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकुण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 3,43,71,845 झाली आहे.
कोरोना नमुण्यांची तपासणी -
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) दिलेल्या माहितीवरून, भारतात गुरुवारी कोरोना व्हायरसचे 15,13,377 नमुने तपासण्यात आले आहेत, तर आतापर्यंत 68 कोटी 68 लाख 19 हजार 128 नमुण्यांची तपासणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - Covid Outbreak In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक.. 24 तासांत 36 हजार जण पॉझिटिव्ह