ETV Bharat / bharat

गोव्यात आणखीन ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू , कोरोनाचा कहर थांबेना

रविवारी आलेल्या ३८७७ कोरोना स्वॅब चाचणी अहवालात १३४४ नवे कोरोनाबाधित सापडले, तर ३,७९३ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. रविवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या ४३ व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २,०९९ वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार २५२ एवढी झाली आहे.

गोव्यात आणखीन ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू
गोव्यात आणखीन ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू
author img

By

Published : May 17, 2021, 12:21 PM IST

पणजी (गोवा) - राज्यात गेल्या पाच दिवसांमध्ये १५,३७१ कोरोनाबाधित बरे झाले असून ११,०८२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. गोव्यासाठी ही सकारात्मक बाब आहे. पाच दिवसांपूर्वी कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा खाली होती. ती आज ७७.७७ टक्के एवढी वाढली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये २९५ कोरोनाबाधित व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. तर रविवारी एका दिवसात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

नव्याने १३४४ नवे कोरोनाबाधित सापडले

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आलेल्या ३८७७ कोरोना स्वॅब चाचणी अहवालात १३४४ नवे कोरोनाबाधित सापडले, तर ३,७९३ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. रविवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या ४३ व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २,०९९ वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार २५२ एवढी झाली आहे. चार दिवसांपूर्वी ती ३२ हजाराच्या वर होती. रविवारी दिवसभरात १४९ कोरोनाबाधितांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

मडगाव येथे सर्वात जास्त कोरोनाबाधित

मडगाव येथे सर्वात जास्त २,१४८ कोरोनाबाधित असून पणजी, चिंबल, पेडणे, म्हापसा, कांदोळी, शिवोली, पर्वरी, फोंडा, कुठ्ठाळी येथे एक हजारपेक्षा जास्त कोरोना संसर्गित व्यक्ती आहेत. सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्यामुळे मृत्यूंची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूण प्रशासकीय कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्यासाठी आरोग्य खात्याने डॉ. जुडे रॉड्रिगीस व डॉ. अजित नगर्सेकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

१२ ते १६ मे या काळात २९५ लोकांचा कोरोनाने मृत्यू

गोव्यात १२ ते १६ मे या काळात २९५ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. १२ मे ला ७० जणांचा मृत्यू झाला. १३ मे रोजी ७० लोकांचा, १४ मे रोजी ६३ लोकांचा, १४ मे रोजी ६१ लोकांचा, १५ मे रोजी ५८ लोकांचा, १६ मे रोजी ४३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे तांडव गोव्यात काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.