ETV Bharat / bharat

बंगाली अभिनेत्री, खासदार नुसरत जहां विभक्त, लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा

तृणमूल काँग्रेसची खासदार असलेली नुसरत जहांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे तीने सांगितले आहे. 2019 मध्ये दोघांनी केलेलं लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासा तीने केला आहे. पैशाचा दुरुपयोग, दागिने आणि अन्य संपत्ती अवैधरित्या निखिलने घेतली असल्याचा आरोप तिने केला आहे.

author img

By

Published : Jun 9, 2021, 5:35 PM IST

Updated : Jun 9, 2021, 5:43 PM IST

नुसरत
नुसरत

कोलकाता - अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार असलेली नुसरत जहांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे तीने सांगितले आहे. 2019 मध्ये दोघांनी केलेलं लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासा तीने केला आहे. पैशाचा दुरुपयोग, दागिने आणि अन्य संपत्ती अवैधरित्या निखिलने घेतली असल्याचा आरोप तिने केला आहे.

नुसरत
नुसरत

निखिल आणि नुसरत गेल्या सहा महिन्यांपासून सोबत राहत नसल्याची माहिती आहे. तसेच नुसरत गर्भवती असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, नुसरत गर्भवती असेल, ते मुल आपलं नसल्याचे निखिलने म्हटलं आहे. अभिनेता यश दासगुप्ता आणि नुसरत एकमेंकाना डेट करत असल्याची माहिती आहे.

'Never let you go': Nusrat Jahan breaks her promise and silence on ongoing controversy
निखिल आणि नुसरतचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत...

लग्न अवैध...

निखिल आणि नुसरतचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत झाले होते. हे लग्न दोन वेगवेगळ्या धर्मीय लोकांचे होते. त्यामुळे सामाजिक विवाह कायद्यानुसार लग्नाची अधिकृत नोंदणी गरजेची होती. नोंदणी न झाल्याने तुर्कीत पार पडलेल्या लग्नाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे नुसरते सांगितले आहे. तसेच आतापर्यंत आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, असेही तीने सांगितले.

2019 मध्ये दोघांनी केलेलं लग्न अवैध

स्टायलिश खासदार म्हणून नुसरतची ओळख

नुसरत हिने अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश घेतल्याने ती संसदेतील स्टायलिश खासदार म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची आणि स्टाईल स्टेटमेंटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. उद्योगपती असलेल्या निखिल जैनशी 'तुर्की' येथे नुसरतने 19 जून 2019 लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हारल झाला होता. लग्नानंतर नुसरत आणि निखिल यांचा रिसेप्शन सोहळा 4 जुलैला कोलकातामध्ये पार पडला होता. मात्र, हे लग्न अवैध नसल्याचे माहिती झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Last Updated : Jun 9, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.