ETV Bharat / bharat

NEET UG exam १२ सप्टेंबरला होणार; प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणार मास्क- धर्मेंद्र प्रधान

author img

By

Published : Jul 12, 2021, 7:12 PM IST

Updated : Jul 12, 2021, 8:33 PM IST

नीट (युजी) २०२१ परीक्षेच्या अर्ज प्रक्रिया १३ जुलैला सायंकाळी एनटी वेबसाईटवरून सुरू होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर फेस मास्क दिले जाणार आहेत.

Dharmendra Pradhan
धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली - नीट (युजी) २०२१ ही परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ ला देशभरात होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून ही परीक्षा घेतली जाणार आहे.

नीट (युजी) २०२१ परीक्षेच्या अर्ज प्रक्रिया १३ जुलैला सायंकाळी एनटी वेबसाईटवरून सुरू होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर फेस मास्क दिले जाणार आहेत

धर्मेंद्र प्रधान यांचे ट्विट
धर्मेंद्र प्रधान यांचे ट्विट

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १६९ रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त

परीक्षा केंद्रावर प्रवेशाची वेळ आणि बाहेर पडण्याची वेळ प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चित करून दिली जाणार आहे. संपर्कविरहित नोंदणी, योग्य स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था केली जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी शहरांमधील परीक्षा केंद्रांची संख्या १५५ वरून १९८ करण्यात आली आहे. २०२० मध्ये असलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये ३८६२ ने वाढ केली आहे.

हेही वाचा-यंदा संसदेचे मान्सून अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट; १९ दिवस चालणार कामकाज

दरम्यान, कोरोनाच्या काळात नीटच्या (युजी) परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.

Last Updated : Jul 12, 2021, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.