गडचिरोली: या आठवड्यात जिल्ह्यातील ही दुसरी घटना असल्याची माहिती पोलीसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, सशस्त्र नक्षलवाद्यांनी पुरस्लागोंडी-अलेंगा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामात गुंतलेले एक जेसीबी मशीन, एक पोकलेन मशीन आणि एक मिक्सर मशीन जाळले. या घटनेची चौकशी सुरू आहे.
वाहनांना लावली आग : याआधीही असाच हल्ला झाला होता. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामात गुंतलेल्या 3 वाहनांना आग लावली होती. यासोबतच काम करत असलेल्या कामगारांना नक्षलवाद्यांनी इशारा दिला होता. यानंतर संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयातील कुकडझोर भागातील घडली होती. कुकडझोर येथील रेंगबाडा परिसरात प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू होते. या भागात रस्ते बांधणीला नक्षलवादी सातत्याने विरोध करत होते. त्यानंतर आज नक्षलवाद्यांनी येथे उपस्थित असलेल्या वाहनांना आग लावली होती. १५ ते २० नक्षलवादी आले होते. रेंगबेडा गावात १५ ते २० नक्षलवादी पोहोचल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पाण्याचा टँकर, १ विब्रो मशीन, १ मोटारसायकल पेटवून दिली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी वाहनांची देखभाल आणि तेथे काम करणाऱ्या मजुरांना काम बंद ठेवण्याचा इशाराही दिला.
जाळली होती 20 वाहने : तशीच आणखी एक घटना घडली होती. जानेवारी महिन्यात भामरागड तालुक्यातील इरपनार येथे नक्षल्यांनी 20 वाहने जाळली होती. अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी दहशत पसरविण्यासाठी ही कृती केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ स्वत: नक्षलवाद्यांनी व्हायरल केला होता. त्यामध्ये नक्षलवादी ट्रॅक्टर- जेसीबी व अन्य वाहने जाळताना दिसले होते. या घटनेत नक्षलवादी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे त्यांच्या शस्त्रांवरून स्पष्ट झाले होते. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात झाले होती.
हेही वाचा: Two Naxalites killed पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक दोन नक्षलवादी ठार