दंतेवाडा (छत्तीसगड) - रूस - युक्रेन युद्ध अद्यापही सुरू आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांनी युक्रेन सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. या युद्धाला युरोपीय देशांकडून तीव्र विरोध होत असून, आता या प्रकरणावर देशातील नक्षलवाद्यांनीही ( Naxalites raised slogans against Biden Putin ) आपली भूमिका जाहीर केली आहे. दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रूस - युक्रेन युद्धाचा विरोध केला आहे. त्यांनी रशिया - युक्रेन युद्धाविरोधात एक पत्र जारी केले आहे.
हेही वाचा - Petrol, Diesel Prices : पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुुरुच, सहा दिवसात वाढले सुमारे पावणे चार रुपये
काय लिहिले आहे पत्रात : युक्रेनवरील हल्ला त्वरीत थांबवून रशियाने आपले सैन्य माघारी घेतले पाहिजे. युक्रेन सरकारने मिंस्क - 2 कराराची अंमलबजावणी करावी. युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करणे बंद करावे. युक्रेनमध्ये नि:शस्त्रीकरणाच्या अंमलबजावणीबाबतही नक्षलवाद्यांनी बोलले आहे.
नक्षलवाद्यांनी जगातील सर्व देशांतील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, अल्पसंख्याक आणि शांतता साधकांना या युद्धापासून वाचवण्यासाठी घोषणा देत आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
दंतेवाड्यात सरपंचाची हत्या : जिल्ह्यात नक्षवाद्यांची हिंसा सुरूच आहे. गुरुवारी उशिरा रात्री नक्षलवाद्यांनी एका संरपंचाची हत्या केली. हे प्रकरण किरंदूल ठाणे क्षेत्रातील आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हिरोली ग्राम पंचायतीचा सरपंच होता. घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण आहे.
हेही वाचा - Panchang 27 March : काय आहे आजचा अमृत काळ? आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ? जाणून घ्या आजचे पंचांग