ETV Bharat / bharat

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ITBP चे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्यासह 2 जवान हुतात्मा - छत्तीसगडमध्ये आयबीटीपीचे जवान शहीद

माहितीनुसार नारायणपूर आणि बारसूर मार्गावर आयबीटीपीची गस्त सुरू होती. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदेसहित 2 जवान हुतात्मा झाले आहेत.

naxalite attack
naxalite attack
author img

By

Published : Aug 20, 2021, 5:52 PM IST

Updated : Aug 20, 2021, 6:54 PM IST

रांची - नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने छत्तीसगडमधील नारायणपूर हादरले आहे. आयटीबीपी जवानांकडून कडेमेटा आणि कडेनार कॅम्पमध्ये शोधमोहिम सुरू असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण आले आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी पळून गेले आहेत. आयटीबीपीने परिसरात वेगाने शोधमोहिम सुरू केली आहे.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयबीटीपीचे असिस्टंट कमांडंटसहित 2 जवानांना वीरमरण आले आहे. नक्षलवाद्यांनी जवानांकडील एके-47 हत्यार, दोन बुलेटप्रुफ जॅकेट आणि वॉकी टॉकीही पळविली आहे. माहितीनुसार नारायणपूर आणि बारसूर मार्गावर आयबीटीपीची गस्त सुरू होती. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आयटीबीपीचे असिस्टंट कमाडंट सुधाकर शिंदेसहित 2 जवान हुतात्मा झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक यू. उदय किरण यांनी पुष्टी केली आहे.

हेही वाचा-ट्विटरनंतर फेसबुकनेही राहुल गांधींची काढली पोस्ट, नियमभंग केल्याचे दिले कारण

बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले, की सर्चिंग करणाऱ्या जवानांवर नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात आयबीटीपी 45 बटालियनचे जवान एसआय गुरमुख सिंह आणि एएसआय सुधाकर शिंदे हुतात्मा झाले आहे. कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

हेही वाचा-अफगाणिस्तान दुतावासासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून 6 आठवड्यांची स्थगिती

चालू वर्षात जुलैमध्येही नक्षलवाद्यांनी केला होता हल्ला-

20 जुलै 2021 रोजी नारायणपूरमध्ये आयबीटीपीचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली होती. आमदार चंदन कश्यप यांच्या रस्ते मार्गावर कडक सुरक्षा करण्यासाठी जवानांना तैनात करण्यात आले होते. त्यावेळी एक जवान जखमी झाला होता. तर जवान शिव कुमार मीना यांना गोळी लागल्याने वीरमरण आले होते.

हेही वाचा-सिंगल-यूज प्लास्टिक वापरल्याबद्दल एअरलाइन्स कंपनी इंडिगोला ठोठावला 25 हजारांचा दंड

Last Updated : Aug 20, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.