नवी दिल्ली - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासोबत घडलेल्या घटनांचा संपूर्ण तपशील आपण ओम बिर्ला यांना सांगितला (Navneet Rana reaction after meeting Lok Sabha Speaker) आहे. ते न्याय देतील अशी मला पूर्ण खात्री आहे, असे यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. राणा दाम्पत्य सोमवारी सकाळीच मुंबईवरून दिल्ला रवाना झाले होते.
ओम बिर्ला मला न्याय देतील - नवनीत राणा म्हणाल्या, माझ्यासोबत जे काही घडले त्याची संपूर्ण माहिती मी लोकसभा अध्यक्षांना दिली. मला अटक झाली, तुरुंगात टाकले. कोणाच्या आदेशाने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले याची सविस्तर माहिती त्यांना दिली आहे. मला खात्री आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मला न्याय देतील. त्यांनी यावर दुःख व्यक्त केले असून, अशी घटना कोणत्याही लोकप्रतिनिधीसोबत होता कामा नये, असे त्यांनी सांगितले असल्याचे राणा म्हणाल्या.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ - जामिनावर सुटलेल्या खासदार नवनीत राणा त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आता राणा दाम्पत्याविरोधात कारणे द्या नोटीस बजावली आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्या विरोधात अजमीनपात्र वॉरंट का जारी करू नये? यावर उत्तर देण्यास राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली आहे.