ETV Bharat / bharat

Navjot Singh Sidhu: तुरुंगामधून सुटल्यानंतर नवज्योत सिंग आज 'हे' करणार पहिले काम - नवज्योत सिंग सिद्धू मुसेवाला कुटुंब भेट

रोड रेज प्रकरणी शिक्षा पूर्ण करून काल पटियाला तुरुंगातून बाहेर आलेले 34 वर्षीय नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. सिद्धू आज सिद्धू मुसेवाला यांच्या घरी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Navjot Sidhu ji will  visit Sidhu moosewala house today at around 1pm
जेलमधून सुटल्यानंतर आज मुसेवाला यांच्या घरी जाणार नवज्योत सिंग सिद्धू
author img

By

Published : Apr 2, 2023, 12:44 PM IST

चंदीगड (पंजाब): पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सुटकेच्या निमित्ताने शनिवारी समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगातून सुटल्यानंतर थेट त्यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांचे कुटुंबीय आणि सिद्धू समर्थकांनी स्वागत केले. याआधी नवज्योतसिंग सिद्धू गुरुद्वारा श्री दुख निवारन साहिब, नंतर काली माता मंदिर पटियाला येथे दर्शन घेऊन घरी जातील, असे सांगितले जात होते. मात्र तुरुंगातून ते थेट घरी पोहोचले.

पंजाबसाठी लढणार: तुरुंगातून बाहेर येताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, पंजाबमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचा कट आहे. जो पंजाबचा नाश करेल, तो स्वतःच नष्ट होईल, असे ते म्हणाले. मी माझ्या कुटुंबासाठी नाही तर पंजाबसाठी लढत असल्याचे सिद्धूने म्हटले आहे. राहुल गांधींचे कौतुक करताना सिद्धू म्हणाले की, क्रांतीचे नाव राहुल गांधी आहे. ते म्हणाले की, पंजाब सरकार आपले अपयश लपवण्यासाठी पंजाबचे वातावरण बिघडवत आहे.

मुख्यमंत्र्यांनी जनतेला मूर्ख बनवले: सुरक्षा कमी करण्यावरून नवज्योत सिंग यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्ला केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांनी पंजाबच्या जनतेला मूर्ख बनवले आहे. ते म्हणाले की, वृत्तपत्रांचे मुख्यमंत्री झाले आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूचा संदर्भ देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग यांनी सुरक्षा अभावाचा संदर्भ देत म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी एका सिद्धूला मारले, आता दुसऱ्या सिद्धूला मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

मुसेवालाच्या वडिलांना मिळाली होती धमकी: दरम्यान नुकतेच पंजाबी गायक आणि माजी काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांचे वडील यांनी लॉरेन्स टोळीतील काही बदमाशांकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार केली होती. मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी ईमेलद्वारे धमकी दिल्याची माहिती दिली होती. मानसा पोलिसांनी मुसेवाला यांच्या वडिलांना धमकावल्याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: कोळसा माफिया होता भाजप नेता आता झाली हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.