रोहतक (हरियाणा) : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर त्यांचे माजी पती नवीन जयहिंदने प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत माझ्याशी कधीही चर्चा झाली नसल्याचे नवीन जयहिंद यांनी सांगितले. तिचे वडील तिला मारहाण करायचे हे नक्की, पण लैंगिक शोषणाचे प्रकरण कधीच समोर आले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी स्वाती मालीवालच्या नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्टचीही मागणी केली आहे.
-
मैडम भूतों से भगवान लड़ लेंगे व सजा भी दे देंगे आप भेड़ियो से लड़ो।आपकी बात सच भी है तो शायद ये पूरा सच नही है!शोषण और यौन शोषण में फ़र्क़ होता है।ख़ुद का नार्को टेस्ट करवाके ख़ुद सार्वजनिक करो क्योंकि पिता पुत्री के पवित्र रिश्ते पर आँच ना आए और डॉक्टर से मैंटल हैल्थ चैक करवाओ🙏 pic.twitter.com/LvoofqZyk9
— नवीन जयहिन्द (@NaveenJaihind) March 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मैडम भूतों से भगवान लड़ लेंगे व सजा भी दे देंगे आप भेड़ियो से लड़ो।आपकी बात सच भी है तो शायद ये पूरा सच नही है!शोषण और यौन शोषण में फ़र्क़ होता है।ख़ुद का नार्को टेस्ट करवाके ख़ुद सार्वजनिक करो क्योंकि पिता पुत्री के पवित्र रिश्ते पर आँच ना आए और डॉक्टर से मैंटल हैल्थ चैक करवाओ🙏 pic.twitter.com/LvoofqZyk9
— नवीन जयहिन्द (@NaveenJaihind) March 12, 2023मैडम भूतों से भगवान लड़ लेंगे व सजा भी दे देंगे आप भेड़ियो से लड़ो।आपकी बात सच भी है तो शायद ये पूरा सच नही है!शोषण और यौन शोषण में फ़र्क़ होता है।ख़ुद का नार्को टेस्ट करवाके ख़ुद सार्वजनिक करो क्योंकि पिता पुत्री के पवित्र रिश्ते पर आँच ना आए और डॉक्टर से मैंटल हैल्थ चैक करवाओ🙏 pic.twitter.com/LvoofqZyk9
— नवीन जयहिन्द (@NaveenJaihind) March 12, 2023
'स्वत:ची लाय डिटेक्टर टेस्ट करावी' : नवीन जयहिंद यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ जारी केला आणि स्वातीने आपल्या वडिलांवर ज्या प्रकारचे आरोप केले आहेत ते अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'तिचे वडील माजी सैनिक होते आणि त्यांच्या मृत्यूला जवळपास 20 वर्षे झाली आहेत. आता सत्य काय आहे आणि काय नाही हे फक्त तीच सांगू शकते. परंतु त्यामुळे जनतेत कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी तिने स्वत: तिची नार्को टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट करून अहवाल सार्वजनिक करावा, जेणेकरून सत्य समोर येईल'. नवीन जयहिंद यांनी सांगितले की, जर अशा घटना घडल्या असतील तर मला वाटतं ती मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ असेल, त्यामुळे तिला डॉक्टरांची गरज आहे. नवीन जयहिंद यांनी मानसिक रुग्णालयात उपचारही सुचवले आहेत.
वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप : विशेष म्हणजे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी 11 मार्च रोजी एका कार्यक्रमात आपल्या वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांची आई, मावशी, काका आणि आजी-आजोबांनी त्यांना या संकटातून बाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले होते. नवीन जयहिंद आणि स्वाती मालीवाल यांचा विवाह २३ जानेवारी २०१२ रोजी झाला. दिल्लीतील अण्णांच्या आंदोलनादरम्यान दोघांची भेट झाली होती. मात्र, 18 फेब्रुवारी 2020 रोजी नवीन आणि स्वाती यांचा घटस्फोट झाला. स्वातीने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली होती.
हेही वाचा : Farmers March Parliament : शेतकरी संघटनांचा संसदेवर मोर्चा, दिल्लीत सुरक्षा वाढवली