पलामू (झारखंड) : झारखंडमधील पलामूमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाशी छेडछाड करण्यात आली. या प्रकरणी 12 जणांसह 50 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम १४७, १२० (बी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर नोंदवल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आता त्यांचा शोध घेण्यासाठी जागोजागी छापे टाकत आहेत.
ध्वजावर अरबी भाषेत कलमा लिहिल्या : पलामूच्या चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याणपूरमध्ये ही घटना घडली. येथे मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते. तज्ज्ञांच्या मते, ध्वजावर अरबी भाषेत कलमा लिहिलेल्या होत्या. या प्रकरणी, मिरवणुकीत तैनात मॅजिस्ट्रेटच्या लेखी अर्जाच्या आधारे, 12 व्यक्ती व 50 अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई : शुक्रवारी मोहरम मिरवणुकीतील एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासानंतर, दंडाधिकार्यांच्या अर्जाच्या आधारे, पलामूच्या चैनपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, मोहरम संपल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.
घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो ताब्यात घेतले : एफआयआर नोंदवल्यानंतर आता पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत, असे चैनपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी रुपेश कुमार दुबे यांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो ताब्यात घेतले आहेत. सर्व आरोपी फरार असून, पोलीस या परिसरात लक्ष ठेवून आहेत.
मोहरमच्या मिरवणुकीत दुर्घटना : झारखंडच्या बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. मिरवणुकीत मोहरमचा ताजिया वर लटकत असलेल्या हाय टेंशन वायरमध्ये अडकल्याने ही दुर्घटना घडली. ताजियाचा विद्युत तारेशी संपर्क झाल्यानंतर बॅटरीचा स्फोट झाला. यामध्ये मिरवणुकीतील 10 जण गंभीररित्या भाजले. यापैकी 4 जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
हेही वाचा :