कोलकाता - बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 30 मतदारसंघांसाठी 27 मार्चला मतदान पार पडलं. आता दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच 1 एप्रिलला मतदान होणार आहे. देशाचे लक्ष लागलेल्या नंदीग्राम मतदारसंघातही उद्या मतदान होणार आहे. नंदीग्रामच्या मैदानातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डरकाळी फोडली आहे. तर ममता यांच्या विरोधात भाजपाने दीदींचा तृणमूल काँग्रेस सोडलेल्या सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात चार जिल्ह्यातील 30 मतदारासंघाच्या 8 हजार 332 मतदान केंद्रावर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 171 उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. बांकुरा मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाचे तब्बल 11 उमेदवार मैदानाता आहेत. तर केशपूर आणि इन्दस मतदारसंघात सर्वांत कमी 3 उमेदवार मैदानात आहेत. दुसऱ्या टप्प्यात 19 महिला उमेदवार आहेत. 76 लाख 7 हजार 667 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कोणी किती उमेदवारांना मैदानात उतरवलं -
तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने 30 ही जागेवर आपले उमदेवार उतरवले आहेत. सीपीआयने दोन जागेवर आपले उमेदवार उभे केले. सीपीआ(एम) ने 15 जागेवर उमेदवारांना उतरवलं आहे. एसयूसीआयने 28 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केलेत. तर बीएसपीने 7 आणि काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. आयनडीने 32 आणि इतर पक्षांनी 18 जागेवर उमेदवारांना उभे केले.
दुसऱ्या टप्प्यातील लक्षवेधी मतदारसंघ -
संपूर्ण देशाचे लक्ष असलेला मतदारसंघ हा नंदीग्राम आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात नंदीग्राम मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. नंदीग्रामसह इतरही काही हायहोल्टेज मतदारसंघ आहेत. डेबरा मतदारसंघात भाजप आणि टीएमसी यांच्यात दोन माजी आयपीएस अधिकारी निवडणूक रिंगणात आहेत. टीएमसीने माजी आयपीएस हुमायून कबीर यांना तिकिट दिले आहे तर भाजपने माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघे पूर्वी एकमेकांचे सहकारी होते. सांबग मतदारसंघात टीएमसीचे उमेदवार मानस भुइंया यांच्याविरोधात भाजपाने अमूल्य माइति यांना उतरवलं आहे.
खडगपूर सदरच्या विधानसभा जागेवरही एक रंजक मुकाबला होणार आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ही जागा जिंकली होती. परंतु लोकसभा खासदार झाल्यावर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यानंतर टीएमसीने 2019 च्या पोटनिवडणुकीत ही जागा जिंकली. भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी भाजपाने विद्यमान आमदार आणि टीएमसीचे प्रदीप सरकार यांच्या विरोधात अभिनेते हिरेन चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे. हे स्पष्ट आहे, की या टप्प्यात अनुसूचित जाती आणि जमाती मतदारांवर लक्ष केंद्रित केले जाईल, कारण या टप्प्यात सुमारे 29% मतदार या समाजातील आहेत. चांदीपूर मतदारसंघात टीएमसीने सोहम चक्रवर्ती आणि पुलक कांती गुरिया यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - हैदराबादच्या रस्त्यांवर अवतरले यमराज; कोरोना जनजागृतीसाठी राचाकोंडा पोलिसांचा उपक्रम