वाराणसी : भारतातील वेद, पुराणात जिच्या सद्गुणांचा उल्लेख आहे, ती गंगा काशीमध्ये मलिन झाली आहे. आता मोक्ष देणाऱ्या गंगेच्या अस्तित्वावर संकटाचं ढग दाटून आलंय. भाजपाची नमामि गंगे योजनाही गंगा स्वच्छ करण्यास अपयशी ठरलीय. गंगेचं पाणी आता आंघोळीसाठीही योग्य नसल्याची परिस्थिती आहे. एनजीटीच्या निरीक्षण समितीनं हा धक्कादायक खुलासा केला आहे. बीएचयूच्या शास्त्रज्ञांनीही यावर चिंता व्यक्त केलीय. गंगा पूर्णपणे दूषित होऊन, नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केलीय. भविष्यात निर्माण होणाऱ्या जलसंकटाकडेही शास्त्रज्ञांनी लक्ष वेधलंय.
31 ठिकाणांहून नमुने घेतले : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) निरीक्षण समितीच्या देखरेखीखाली राज्यातील 31 ठिकाणांहून गंगेचे नमुने घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर गंगेचं पाणी प्रदूषित आढळलंय. समितीनं एनजीटीला या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आदेश यूपी सरकारच्या नगर विकास विभाग, जलशक्ती विभाग, यूपीपीसीबीला देण्याची शिफारस केलीय. या समितीचे अध्यक्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसव्हीएस राठोड होते.
गंगेचं पाणी C, D श्रेणीत : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) अहवालानुसार, वाराणसी, मिर्झापूर, गाझीपूर, सोनभद्र, प्रयागराज, कन्नौज, कानपूर, हापूर, बिजनौर आणि राज्यभरातील 31 ठिकाणांहून गंगेचे नमुने घेण्यात आले होते. तपास अहवालानुसार उत्तर प्रदेशातील गंगा नदीचं पाणी बहुतांश ठिकाणी सी आणि डी श्रेणीत पोहचलं आहे. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं जानेवारी २०२३ मध्ये जारी केलेल्या नदी जल गुणवत्ता अहवालात म्हटलं होतं की, वाराणसीतील गंगा, गोमती नद्यांचं पाणी सतत प्रदूषित होत आहे. त्यामुळं पाणी सी तसंच ड श्रेणीत पोहोचलंय.
गंगेची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न अयशस्वी : काशी हिंदू विद्यापीठातील प्रा. एनडी त्रिपाठी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. गंगा नदीचं पाणी स्वच्छ करण्यासाठी पध्दतशीर प्रयत्न व्हायला हवे होते. ते होतांना दिसत नाहीत. पुराच्या पाण्यातून येणाऱ्या मातीमुळं गंगा नदीचं पाणी दूषित झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, पुराचं पाण्यात फक्त माती येते, प्रदूषण होत नाही. पाण्याची गुणवत्ता प्रदूषणावर अवलंबून असते. केवळ माती पाण्यात मिसळल्यानं प्रदूषणाची पातळी वाढत नाही.
हेही वाचा -
- Chandrayaan ३ Rover : 'प्रज्ञान' रोव्हरचं चंद्रावरील कार्य पूर्ण, रोव्हर स्लीप मोडमध्ये सेट
- Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका
- Five children died in Aurangabad : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू