ETV Bharat / bharat

Nainital Bus Accident : उत्तराखंडात शाळेची बस दरीत कोसळून भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

Nainital Bus Accident : उत्तराखंडमधील नैनितालमधील कालाधुंगी पोलीस स्टेशन परिसरात बस खोल खड्ड्यात पडून अपघात झालाय. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 32 जण होते असं सांगण्यात येत आहे. तसंच ते हरियाणाचे रहिवासी असल्याचंही सांगितलं जातंय. ज्यात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Nainital Bus Accident
Nainital Bus Accident
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 9:44 AM IST

नैनिताल (उत्तराखंड) Nainital Bus Accident : नैनितालमध्ये एका बसचं नियंत्रण सुटल्यानं ती खोल दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. नैनिताल कलाधुंगी रोडवरील नालनी येथे हा अपघात झालाय. या बसमध्ये 32 प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. यातील 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मृतांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. बसचालकाचाही अपघातात मृत्यू झालाय. त्याचबरोबर जखमींवर उपचार सुरू आहेत. तर जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

रविवार ठरला अपघातवार : उत्तराखंडमध्ये रविवार हा अपघातांचा दिवस ठरला. पिथौरागडमध्ये बोलेरो वाहनावर दगड पडल्यानं 8 जण दबल्याची घटना ताजी असतानाच आता नैनिताल जिल्ह्यात एक बस खड्ड्यात पडल्यानं मोठा अपघात झालाय. नैनिताल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालाधुंगी रोडवरील नालनी येथे एका खासगी बसला अपघात झाला. बसमध्ये सुमारे 32 जण होते अशी माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचत बचावकार्य हाती घेतलं.

हरियाणातील बसला अपघात : दरम्यान, नैनितालचे एसएसपी प्रल्हाद नारायण मीणा यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, ही बस हिसार, हरियाणातून पर्यटकांना घेऊन जात होती. ते नैनितालला भेटायला आले होते. यातील सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे. या बसमध्ये शिक्षक, शाळेचे कर्मचारी आणि काही मुलंही प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 24 गंभीर जखमींना मध्यवर्ती आरोग्यकेंद्रात पाठवलं जात आहे. तर मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

पिथौरागडमध्ये बोलेरोवर पडला दगड: रविवारी पिथौरागढच्या धारचुलामध्येही मोठा अपघात झाला. धारचुला गुंजी रस्त्यावरील खडी कोसळल्यानं वाहनासह अनेक जण दबले गेले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय केदारनाथ महामार्गावरील गौरीकुंडजवळील टेकडीवरूनही खड्डे पडले आहेत. ज्यामध्ये दोन वाहनांचे नुकसान झालंय.

हेही वाचा :

  1. Heavy Rain Alert : उत्तराखंड, उत्तर प्रदेशात अति मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या भागाला आहे मुसळधार पावसाचा धोका
  2. Adi Kailash Yatra News: हिंदू धर्मात आदि कैलाश यात्रेचे काय आहे महत्त्व? खराब हवामानामुळे दोन महिन्यांकरिता यात्रा झाली स्थगित
  3. Uniform Civil Code : 'या' राज्यात लवकरच लागू होणार समान नागरी कायदा, मसुदा तयार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.