ETV Bharat / bharat

भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या मुस्लीम युवकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

भाजपचा प्रचार करणाऱ्या एक युवकाला निर्घूणपणे मारहाण ( BJP win celebration Babar death ) केल्याची घटना जनपदच्या रामकोला ठाण्याच्या कठघरही गावातून समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबर असे युवकाचे नाव आहे.

muslim youth beaten kushinagar
भाजप प्रचार बाबर हत्या
author img

By

Published : Mar 28, 2022, 11:18 AM IST

कुशीनगर (उ.प्र) - भाजपचा प्रचार करणाऱ्या एक युवकाला निर्घूणपणे मारहाण ( BJP win celebration Babar death ) केल्याची घटना जनपदच्या रामकोला ठाण्याच्या कठघरही गावातून समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबर असे युवकाचे नाव आहे.

माहिती देताना बाबरचे कुटुंबीय

हेही वाचा - केंद्रीय ट्रेड युनियनकडून आजपासून 2 दिवसीय भारत बंदचे आवाहन, बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता

बाबरच्या कुटुंबीयानुसार, यूपी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये बाबरने भाजपचा प्रचार केला होता. यामुळे शेजारील पट्टीदार हे संतापले होते. त्यांनी अनेकदा बाबरला भाजपचा प्रचार करण्यासाठी मनाई केल होती आणि न मानल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. याची तक्रार बाबरने रामकोला ठाण्यात केली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांची हिम्मत वाढली. 20 मार्चला दुकानातून परत आल्यानंतर बाबरने 'जय श्री राम' चा नारा लावला, तेव्हा पट्टीदार अजीमुल्लाह, आरिफ ताहिद, परवेज भडकले आणि त्यांनी आपल्या साथिदारांसह बाबरवर हल्ला केला.

कुटुंबाने सांगितले की, या हल्ल्यात महिलांचा देखील समावेश होता ज्यांनी बाबरला बेदम मारहाण केली. कसाबसा जीव वाचवून बाबर छतावर गेला, मात्र पट्टीदारांनी त्याला छतावरून खाली फेकले. यामुळे तो जखमी झाला. बाबरला उपचारासाठी रामकोला सीएचसीमध्ये नेण्यात आले, तेथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला लखनौला रेफर केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आमदार पी.एन. पाठक आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पीडितांना देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. बाबरच्या पार्थिवाला आमदारांनी स्वतः खांदा दिला. ही घटना अत्यंत लाजिरवाणी असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा - Petrol, Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.