ETV Bharat / bharat

Bullet Train Bharuch Station : बुलेट ट्रेनसाठी नर्मदा नदीवर पूल बांधण्याचे काम सुरु, 783 पिलर होतायेत तयार - बुलेट ट्रेन प्रकल्प

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या ठिकठिकाणी सुरु आहे. बीकेसीवरून निघणारी बुलेट ट्रेन पुढे भरूचमार्गे अहमदाबाद्ला दाखल होणार आहे. भरूच जिल्ह्यातही बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण 31.3 किमी लांबीचा मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच 783 पिलर या मार्गावर असणार आहेत. पिलर उभारण्याचे काम देखील सध्या येथे सुरु असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय नर्मदेवर सर्वात लांब पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे.

mumbai ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प
author img

By

Published : Jan 18, 2023, 10:49 PM IST

Updated : Jan 18, 2023, 11:06 PM IST

भरुच (गुजरात) : महाराष्ट्र गुजरातसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरातमधील भरुच येथेही थांबा आहे. भरुचमधील मनुबर गावाजवळ बुलेट ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाचे कामही सुरू झाले आहे. मनुबर गावाजवळ बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाचे भव्य बांधकाम होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण 31.3 किमीचा रेल्वे मार्ग भरूच जिल्ह्यातून जाणार आहे. याशिवाय रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्यातून एकूण 783 खांब उभारण्यात येणार आहेत. ज्याचे 40 टक्के काम पूर्ण होणार आहे.

पुलांचे काम सुरू : भरुचमधील नर्मदा नदीवरील बुलेट ट्रेन पुलाच्या बांधकामात मुख्य पुलाच्या दोन्ही बाजूला 8 मीटर रुंदीचे 2 पूल बांधण्यात आले आहेत. नर्मदा पुलानंतर तापी आणि माही पूल 720 मीटर लांबीचा दुसरा क्रमांक असेल. भरुच शहरातील नर्मदा नदीवरील 1.2 किमी लांबीचा पूल 508 किमीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमधील सर्वात लांब पूल बनणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने सांगितले की, हा पूल जून 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

mumbai ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

2024 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज : अहमदाबाद ते मुंबई दरम्यानच्या प्रकल्पातील मार्गावरील कामांना सुरूवात झाली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या तुलनेत बांधकामाचा कालावधी जवळपास निम्म्याने कमी होईल. आम्ही ते 2024 पर्यंत पूर्ण करण्याची अपेक्षा करत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. जम्मू उधमपूर कटरा प्रकल्प बांधणाऱ्या टीममध्ये शर्मा देखील होते.

mumbai ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

प्रकल्पांतर्गत 20 पूलांची निर्मीती : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते, या प्रकल्पांतर्गत एकूण 20 पूल बांधले जातील. कारण बुलेट ट्रेन नर्मदा, साबरमती, माही, कावेरी, पूर्णा अंबिका, दरोथा, दमण गंगा, कोलक, मिंधोला, अनुराग, खरेरा या नद्या पार करेल. तापी, कीम, धाधर, विश्वामित्री, मोहर, वात्रक आणि मेश्वो. सर्वात लांब पूल नर्मदेवर बांधला जाईल, त्यानंतर तापी आणि माही वर बांधला जाईल जो सुमारे 720 मीटर असेल. जून २०२४ पर्यंत सर्व पुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Bullet Train Vapi Station : गुजरातच्या प्रवेशद्वाराजवळ बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात; जाणून घ्या, वापी स्टेशनची स्थिती

Last Updated : Jan 18, 2023, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.