ETV Bharat / bharat

Aparna Yadav Join BJP : मुलायमसिंह यादवांची सून भाजपात प्रवेश करण्याची शक्यता - उत्तर प्रदेश निवडणूक मराठी बातमी

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव ( Sp Mulayam Singh Yadav ) यांची सून अपर्णा यादव या भाजपात प्रवेश करण्याची ( Aparna Yadav Join Bjp ) शक्यता वर्तवली जात आहे. अपर्णा यादव या प्रतिक यादव यांच्या पत्नी आहेत.

Aparna Yadav
Aparna Yadav
author img

By

Published : Jan 16, 2022, 1:02 PM IST

लखनौ - देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यात फोडोफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. या आठवड्यात भाजपाच्या 3 कॅबिनेट मंत्री आणि काही आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव ( Sp Mulayam Singh Yadav ) यांच्या सुनबाई अपर्णा यादव या भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता ( Aparna Yadav may be Join BJP ) वर्तवली जात आहे.

अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांचा मुलगा प्रतिक यादव यांच्या ( Aparna Yadav Pratik Yadav Wife ) पत्नी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा यादव या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अपर्णा यादव यांनी 2017 साली समाजवादी पक्षाच्या तिकीटावरुन कैंट विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपाच्या रीटा बहुगुणा जोशी यांनी अपर्णा यादव यांचा दारुण पराभव केला होता.

तसेच, समाजवादी पक्षात राहून सुद्धा अपर्णा यादव या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना दिसून आल्या आहेत. दरम्यान, अनेक नेते अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश करत असताना अपर्णा यादव भाजपात गेल्यास समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.

मंत्र्यांचा सपात प्रवेश

भाजपाचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि धरमसिंह सैनी यांच्यासह अन्य आमदारांनी शुक्रवारी त्यांच्या कार्यकर्त्यांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. तर फिरोजाबाद जिल्ह्यातील सिरसागंज येथील समाजवादीचे आमदार हरिओम यादव यांनी भाजपात प्रवेश केला.

हेही वाचा - Rokhthok Articles On Justice System : राजकीय पक्षांच्या चेहऱ्यांकडे पाहून न्याय! 'रोखठोक'मधून समाचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.