ETV Bharat / bharat

MS Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचं निधन, चेन्नईत घेतला 'अखेरचा श्वास' - मोणकोंबू सांबशिवन

MS Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक एस एस स्वामीनाथन यांचं गुरुवारी सकाळी चेन्नईत निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी एम एस स्वामीनाथ यांनी अखेरचा श्वास घेतला.

MS Swaminathan Passed Away
हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 12:35 PM IST

Updated : Sep 28, 2023, 1:33 PM IST

चेन्नई MS Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक एस एस स्वामीनाथन यांचं गुरुवारी सकाळी चेन्नईत निधन झालं. एस एस स्वामीनाथन यांनी हरित क्रांती करुन शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल केले होते. एम एस स्वामीनाथन यांनी वयाच्या 98 व्या वर्षी चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी 11.28 वाजता अखेरचा श्वास घेतला. एम एस स्वामीनाथन यांच्या मागं पत्नी मिना, सौम्या, मधुरा आणि नित्या या तीन मुलींसह मोठा आप्त परिवार आहे.

कावेरी नीदकाठच्या गावावरुन ठेवलं नाव : शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवणारा अवलिया म्हणून डॉ एम एस स्वामीनाथन उर्फ मोणकोंबू सांबशिवन यांचं नाव घेतलं जाते. एम एस स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्टला 1925 मध्ये कुंभकोणम या ठिकाणी झाला. कावेरी नदीच्या समृद्ध काठावर असलेल्या अलेप्पी जिल्ह्यात असलेल्या कुट्टनाड परिसरातील मोणकोंबू हे त्यांचं मूळ गाव. या गावात डॉ सांबशिवन यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांना मोठी मदत केल्यानं त्यांचा गावावर प्रभाव होता. तेच गुण एम एस स्वामीनाथ यांच्यात आले. मोणकोंबू या त्यांच्या गावाच्या नावावरुनच मोणकोंबू असं एम एस स्वामीनाथन यांचं नाव ठेवण्यात आलं.

एम एस स्वामीनाथन यांचं शिक्षण : एम एस स्वामीनाथन यांचं प्राथमिक शिक्षण कुंभकोणममधील लिटल फ्लॉवर आणि नेटीव्ह हायस्कूल इथून झालं. वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे पितृछत्र हरवल्यानं त्यांना आईचा आधार लाभला. त्यानंतर 1940 ला शिक्षण पूर्ण करुन एम एस स्वामीनाथ हे तत्कालिन त्रिवेंद्रम म्हणाजे आताचं तिरुअनंतपूरमला आले. एम एस स्वामीनाथन हे त्रावणकोर संस्थानचे सचिवही होते. प्राणीशास्त्रात पदवी घेतल्यानंतर एम एस स्वामीनाथन यांनी विद्यापीठात असताना स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी त्रिवेंद्रम विद्यापीठ बंद पाडलं, होतं. मात्र यावेळी प्रा रामास्वामींनी त्यांना परावृत केलं. मात्र त्यानंतर एम एस स्वामीनाथन यांनी विविध क्षेत्रात आपलं चतुरस्र व्यक्तीमत्व म्हणून काम केलं.

हरित क्रांतीनं घडवला बदल : एम एस स्वामीनाथन यांनी अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. एम एस स्वामीनाथन यांनी केलेल्या हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी एम एस स्वामीनाथन यांनी अनेक प्रयोग केले. त्यामुळे एम एस स्वामीनाथन यांना 1971 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार, 1986 मध्ये अलबर्ट आईनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

हेही वाचा :

'मी झिरो बजेट फार्मिंग या संकल्पनेशी सहमत नाही'

Last Updated : Sep 28, 2023, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.