ETV Bharat / bharat

NEET Aspirant Suicide : NEET ची तयार करत असलेल्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रणव वर्मा (17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोटा येथील लँडमार्क भागातील कृष्णा रेसिडेन्सीमध्ये राहत होता. हा विद्यार्थी मूळचा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील मणियार टोल टॅक्स परिसरातील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून येथे राहून तो वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होता. (student from Shivpuri MP committed suicide)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 12, 2022, 5:15 PM IST

कोटा (राजस्थान) : कोटा शहरातील कुनहाडी भागात रविवारी रात्री एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. (student from Shivpuri MP committed suicide). मृत विद्यार्थी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रहिवासी असून तो गेल्या दोन वर्षांपासून कोटा शहरात वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होता. (Neet Aspirant suicide in Kota). विद्यार्थी वसतिगृहाच्या कॉरिडॉरमध्ये बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याने उंदराचे विष प्राशन केले असावे, असे प्राथमिक अहवालात समोर येत आहे. रविवारी रात्री उशिरा दोनच्या सुमारास वसतिगृह चालक व वॉर्डन यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याला घाईघाईने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (suicide by consuming rat poison in Kota).

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : मृत विद्यार्थ्याचा मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कुटुंबीय सोमवारी सकाळी कोटा येथे पोहोचले (NEET aspirant commit suicide in Kota) आणि मृतदेहाचे पोस्टमॉर्टम त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही तसेच विद्यार्थ्याच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

मुळचा मध्य प्रदेशातील : कुन्हडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, प्रणव वर्मा (17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोटा येथील लँडमार्क भागातील कृष्णा रेसिडेन्सीमध्ये राहत होता. हा विद्यार्थी मूळचा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील मणियार टोल टॅक्स परिसरातील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून येथे राहून तो वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होता.

उंदराचे औषध सेवन केल्याचा संशय : त्यांनी सांगितले की, रविवारी पहाटे 2 वाजता हा विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहाच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. तो वेगाने श्वास घेत होता, पण त्याला काहीच बोलता येत नव्हते. याबाबत माहिती दिल्यानंतर वसतिगृह चालक त्यांच्या खोलीत गेले असता तेथे त्यांना उंदराच्या विषाचे पाकीट आढळून आले. विद्यार्थ्यानेच हे औषध सेवन केल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत विद्यार्थ्याचे वडील ब्रिजेश यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आणि सकाळीही त्यांचे मुलाशी बोलणे झाले होते. पण तेव्हा सर्व काही ठीक होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.