उन्नाव(उत्तर प्रदेश) - नामिबियामधून आफ्रिकन चित्ते भारतात ( Namibia Cheetahs in india) विशेष विमानाने आणण्यात आले आहेत. यावरून अनेकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तर खासदार साक्षी महाराज यांनी चित्ते भारतात आणल्याप्रकरणी मोठे विधान केले (MP Sakshi Maharaj react on cheetah project) आहे. 'चीता, चीता को ही लेकर आएगा कुत्ते को नहीं' अशी प्रतिक्रिया साक्षी महाराज यांनी दिली आहे. ते उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने या 8 चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये सोडण्यात आले.
साक्षी महाराजांचे विधान - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त उन्नावमधील कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस सेवा पखवाडा म्हणून साजरा केला. यावेळी खासदार साक्षी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, देवाला विनंती करेन की गरज पडल्यास माझे वयही पंतप्रधान मोदींना द्यावे, माझी हरकत नाही. चित्ता आणण्याबाबत ते म्हणाले की, 'चीता, चीता को ही लेकर आएगा कुत्ते को नहीं'.
माझा जीव मोदींना देण्यास तयार - उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले की, उन्नावमध्ये हा सेवा पखवाडा 17 सप्टेंबर, पीएम मोदींचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत आयोजित केला जाईल. ते म्हणाले की, राष्ट्रीय उभारणीत साक्षी महाराजांच्या जीवाची गरज असेल तर मी पंतप्रधानांना माझा जीव द्यायला तयार आहे, कारण मोदींसारखे लोक हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येतात. हे अवतार आहेत. धर्माची स्थापना करण्यासाठी ते दुष्टांचा नाश करण्यासाठी या पृथ्वीवर येतात.
70 वर्षांची प्रतीक्षा संपली - चित्त्यांना देशात आणण्याची 70 वर्षांची प्रतीक्षा संपली, आफ्रिकन चित्ते ( African Cheetah ) विशेष विमानाने नामिबिया सोडल्यानंतर देशाच्या भूमीवर दाखल झाले आहेत. आठ चित्त्यांना 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे.