ETV Bharat / bharat

Mountaineer Savita Kanswal : एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर मकालू पर्वतावर यशस्वी चढाई, वाचा गिर्यारोहक सविता कंसवाल यांची स्टोरी

गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी 12 मे 2022 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर  (8848.86 मीटर) तिरंगा फडकावला. त्यांची पावले एव्हरेस्टवरच थांबली नाहीत. त्यांनी 15 दिवसांनंतर 28 मे रोजी माकालू (8463 मीटर) पर्वतावर यशस्वी चढाई ( Mountaineer Savita Kanswal conquered Everest ) केली. 15 दिवसांत दोन्ही पर्वत चढून त्याने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

Mountaineer Savita Kanswal
सविता कंसवाल
author img

By

Published : Jun 1, 2022, 10:27 PM IST

उत्तरकाशी - भटवाडी ब्लॉकमधील लोंथरू गावातील रहिवासी गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी एव्हरेस्ट शिखर सर ( Mountaineer Savita Kanswal Latest News ) केले. त्यानंतर 15 दिवसांत मकालू पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे. त्यांच्या यशाने परिसरात ( Savita Kanswal of Lonthru village ) आनंदाची लाट पसरली आहे.

गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी 12 मे 2022 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर (8848.86 मीटर) तिरंगा फडकावला. त्यांची पावले एव्हरेस्टवरच थांबली नाहीत. त्यांनी 15 दिवसांनंतर 28 मे रोजी माकालू (8463 मीटर) पर्वतावर यशस्वी चढाई ( Mountaineer Savita Kanswal conquered Everest ) केली. 15 दिवसांत दोन्ही पर्वत चढून त्याने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

बालपण आर्थिक संकटात-सविता कंसवाल यांचे बालपण आर्थिक संकटात गेले. सविताच्या आई-वडील शेती करतात. सविता यांचे रकारी शाळेतून शालेय शिक्षण झाले. चार बहिणींमध्ये सर्वात लहान असलेल्या सविता यांना वडील राधेश्याम कंसवाल आणि आई कमलेश्वरी देवी यांनी कसलीच उणीव जाणवू दिली नाही. सविता यांनी आई-वडिलांची काळजी आणि घरच्या जबाबदाऱ्याही अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी सविताने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आणि माकालू हे शिखर सर करून त्यांनी तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

कुशल प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत- सरकारी शाळेतून शिकलेल्या सविताने 2013 मध्ये उत्तरकाशीच्या नेहरू पर्वतारोहण संस्थेतून गिर्यारोहणाचा मूलभूत अभ्यासक्रम केला. सविता यांनी प्रगत आणि शोध आणि बचाव अभ्यासक्रमांसह पर्वतारोहण प्रशिक्षक अभ्यासक्रमही केला. सविता नेहरू पर्वतारोहण संस्थेत कुशल प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. निमचे प्राचार्य कर्नल अमित बिश्त, गिर्यारोहक विष्णू सेमवाल, गिर्यारोहक संघटनेचे आदींनी निममधून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेल्या गिर्यारोहक सविता यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

सविताने माकालू आणि माउंट एव्हरेस्टच्या आधी अनेक पर्वत सर केले आहेत. यामध्ये त्रिशूल पर्वत (7120 मी), हनुमान टिब्बा (5930 मी), कोलाहाई (5400 मी), द्रौपदीचा दांडा (5680 मी), तुलियान शिखर (5500 मीटर) यांचा समावेश आहे. यासह सविताने जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माउंट ल्होत्सेदेखील (8516 मीटर) सर केले आहे.

हेही वाचा-Indian Boxer Meets PM Modi : बॉक्सर निखतसह इतर खेळाडूंनी घेतली पीएम मोदींची भेट

हेही वाचा-Dynastic Politics : राष्ट्रवादी, शिवसेनेह इतर पक्ष म्हणजे राजकारणातील घराणेशाही, भाजप तत्व सोडणार नाही - जे पी नड्डा

हेही वाचा-Panther hunted rabbit : रस्त्यात पँथरकडून काही सेकंदातच सशाची शिकार, सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.