मुरादाबाद उत्तरप्रदेश मुरादाबाद पोलिसांच्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक पेज moradabad police fake facebook page तयार करून त्यावर पाकिस्तानचा झेंडा लावला आहे. या पेजवर मुख्यमंत्री योगी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली reward of two crores to who beheaded cm yogi आहे. याबाबत एका युजरने ट्विटरच्या माध्यमातून मुरादाबाद पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. आत्मप्रकाश पंडित याच्या नावावर हे खाते आहे. हे खाते हॅक करून त्याचा गैरवापर होत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. मुरादाबाद सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे.
जिल्हा पोलिसांच्या फेसबुक पेजवर पाकिस्तानी झेंडा, जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो आणि यूपीच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटींचे बक्षीस जाहीर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुरादाबाद पोलिसांच्या ट्विटर हँडलवर आयुषी माहेश्वरी नावाच्या महिलेने याबाबत तक्रार केली आहे. हे सर्व फोटो आत्माप्रकाश पंडित नावाच्या फेसबुक युजरने मुरादाबाद पोलिसांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
भारतीय जनता मजदूर संघाच्या महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा आयुषी माहेश्वरी यांनी आत्मप्रकाश पंडित यांचे खाते तपासले असता त्यात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो, पाकिस्तानचा ध्वज, मुरादाबाद जिल्हा दंडाधिकारी यांचा फोटो आणि दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिसून आले. मुरादाबाद पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुरादाबाद सायबर सेलची मदत घेतली. तपासात असे आढळून आले की ज्या व्यक्तीचे खाते आहे त्या व्यक्तीने पोलिसांना अर्ज देऊन आपले खाते हॅक झाल्याची तक्रार केली होती. पोलीस त्याचा तपास करत आहेत.
एसपी सिटी अखिलेश भदौरिया यांनी सांगितले की, मुरादाबाद पोलिसांच्या नावाने सुरु करण्यात आलेले फेसबुक पेज बनावट आहे. या संपूर्ण प्रकरणाची सायबर सेल चौकशी करत आहे. ज्या व्यक्तीचे खाते वापरण्यात आले आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर सेल करत आहे. फेसबुकला हे खाते बंद करण्यास सांगितले आहे. moradabad police fake facebook page announced a reward of two crores to who beheaded cm yogi
हेही वाचा Facebook Friend Raped Married Woman फेसबुक फ्रेंडचा विवाहित महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड