नवी Money Laundering Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं नबाव मलिक यांना मनी लाँड्रींग प्रकरणात सहा महिने जामीन वाढवून दिला आहे. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि पंकज मिथल यांच्या खंडपीठानं हा जामीन वाढवून दिला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी अंमलबजावणी संचालनालयातर्फे आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी "नवाब मलिक यांच्या जामिनावर कोणताही आक्षेप नाही" असं सांगितल्यानंतर नवाब मलिक यांना खंडपीठाकडून वैद्यकीय जामीन वाढवण्यात आला आहे.
नवाब मलिक यांच्या जामिनात अगोदरही झाली होती वाढ : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनात या अगोदरही वाढ करण्यात आली होती. मागील वर्षी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयानं नबाव मलिक यांच्या जामिनात तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीत वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळं नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय आहे नवाब मलिक मनी लाँड्रींग प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्यांच्यावर दाऊदची बहीण हसिना पारकर आणि भाच्याकडून कमी किमतीत संपत्ती विकत घेतल्याचा आरोप ईडीनं केला आहे. ईडीनं या प्रकरणी इकबाल कासकर आणि छोटा शकीलचा निकटवर्तीय सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट्स याची चौकशी केली होती. त्यांच्या चौकशीतून तत्कालिन मंत्री नवाब मलिक यांचं नाव पुढं आल्याचा दावा ईडीनं केला होता. त्यानंतर ईडीनं नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती.
हेही वाचा :