ETV Bharat / bharat

'जय श्रीरामाची घोषणाही आता ममता बॅनर्जींना अपमानास्पद वाटते'

author img

By

Published : Jan 24, 2021, 7:12 AM IST

कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जी बोलण्यासाठी उभ्या राहिल्या असता, समोरच्या नागरिकांनी जय श्रीराम ची घोषणाबाजी केली. त्यावरून ममता यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे अपमानित करणे शोभनिय नसल्याचे म्हणत भाषण करणे टाळले.

'जय श्रीरामाच्या घोषणेमुळे ममता बॅनर्जींना अपमानित वाटते'

लखनऊ - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर यूपी सरकारचे राज्यमंत्री मोहसीन रजा यांनी टीका केली आहे. जय श्री रामच्या जय घोषणेने ममता बनर्जींना अपमान झाल्यासारखे वाटत असल्याची टीका रजा यांनी केली आहे.

कोलाकातामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यावेळी कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जी बोलण्यासाठी उभ्या राहिल्या असता, समोरच्या नागरिकांनी जय श्रीराम ची घोषणाबाजी केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सरकारी कार्यक्रमाची एक प्रतिष्ठा असायला हवी, हा काही राजकीय कार्यक्रम नाही, अशा प्रकारे आमंत्रण देऊन अपमानित करणे अशोभनीय असल्याचे म्हणत ममता यांनी जय हिंद आणि जय बंगलाचा नारा देऊन पुढे काही बोलण्याची इच्छा नसल्याचे सांगत आपले भाषण थांबवले. त्यावरून मोहसीन रजा यांनी शनिवारी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

ममता बॅनर्जींना अपमानित वाटते'

ममता बॅनर्जींनी जनतेचा अपमान केला-

मोहसीन रजा म्हणाले कीस ममता बॅनर्जी यांना आता राम नामामुळे देखील अपमानित वाटत आहे. यावरून विचार करु शकतो की बंगालमधील जनतेचा ममता बॅनर्जी यांच्याकडून किती प्रमाणात अपमान होत असेल. जय श्रीराम ही घोषणा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. देशाच्या संस्कृतीलाच ममता बॅनर्जी पसंद करत नाहीत. जर जय श्री राम, भारत माता की जय आणि वंदे मातरम ऐकून ममता बॅनर्जी यांना इतका अपमान वाटत असेल, तर मागील १० वर्षांपासून बंगालची जनता यांच्या अशा मानसिकतेमुळे किती अपमानित होत असेल. मात्र, येथील जनता ममता बॅनर्जींना याचे उत्तर देईल असे राज्यमंत्री मोहसीन म्हणाले.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांचीही टीका-

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल मध्ये आयोजित कार्यक्रमातील जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममतांनी नाराजी व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्या या नाराजीवर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी देखील ट्वीट करून टीका केली आहे. 'जय श्री रामाची घोषणा म्हणजे ममता बॅनर्जी यांना वळूबैलास लाल कापडाचा जसा राग आहे. तसे वाटत असल्याची टीका विज यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.