नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेश मधून बेपत्ता झालेला 17 वर्षीय भारतीय तरुण चीनच्या सीमेवर सापडला (Indian man was found Chinese border) आहे. भारतीय लष्कराने याबाबत दुजोरा दिला आहे. तेजपुर संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट हर्षलर्धन पांडे यांनी सांगितले की, चीनी सैनिकांनी आम्हाला माहिती दिली आहे की, त्यांना अरुणाचल प्रदेशचा एक बेपत्ता तरुण सापडला आहे. तसेच योग्य प्रक्रियेचे पालन केले जात आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये कथितपणे चीनी सेना पीपुल्स लिबरेशन आर्मीने (People's Liberation Army) 17 वर्षीय एका भारतीय तरुणाला बंदी बनवल्याचे प्रककरण समोर आले होते. अरुणाचल प्रदेशच्या लोकसभेचे खासदार तपीर गाओने यांनी दावा केला होता. खासदार तपीर गाओने सांगितलेल होतेकी, 17 वर्षीय तरुण मिरान तारणला मंगळवारी भारतीय हद्दीतून पीएलएने बंदी बनवले होते. गाओने सांगितले की, जिदो गावच्या राहणाऱ्या 17 वर्षीय तरुण मिरान तारणचे अपहरण करुन चिनी सैनिकांकडून त्याला बंदी बनवण्यात आले होते. ही घटना 18 जानेवारी 2022 ची आहे. आता या प्रकरणात खासदाराने केंद्र सरकारकडे मदतीची साकडे घातले आहे.
या घटनेची माहिती देताना खासदार म्हणाले की, 18 जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील सियुंगला भागात चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीतून तरुणांना पळवून नेले होते. खासदाराच्या म्हणण्यानुसार, तरुणाचा मित्र पीएलएच्या तावडीतून सुटला आणि त्याने येऊन अधिकाऱ्यांनाया घटनेची माहिती दिली. तापीर गाओ यांनी भारत सरकारच्या (Tapir Gao request Government of India) सर्व एजन्सींना विनंती केली आहे की, त्यांनी तरुणांच्या लवकर सुटकेसाठी पावले उचलावीत. लुंगटा जोर हा भारतीय प्रदेश आहे जिथे चीनने 2018 मध्ये भारतामध्ये 3-4 किमीचा रस्ता बांधला होता. चिनी सैनिकांनी अपहरण केलेले तरुण आणि त्याचा मित्र दोघेही स्थानिक शिकारी आणि जिदो गावातील रहिवासी आहेत.
हेही वाचा: Adventure campaign : पन्नाशी ओलांडलेल्या 10 महिला साहसी मोहिमेत पार करणार 40 पर्वतरांगा