ETV Bharat / bharat

Bihar Crime : होळी खेळण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची वडिलांसमोरच हत्या - मिथिलेश प्रसाद

बिहारच्या गयामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही. वडिलांनी होळी खेळण्यास नकार दिल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीची वडिलांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

Bihar Crime
मुलीची वडिलांसमोरच हत्या
author img

By

Published : Mar 10, 2023, 7:40 AM IST

पाटणा ( बिहार ) : बिहारच्या गयामध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले. एका व्यक्तीने होळी खेळण्यास नकार दिल्याने त्यांच्या मुलीवर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रंग लावण्याचा कारणावरून आधी तिथे भांडण झाले, मग शिवीगाळ करण्यात आला होता. गया जिल्ह्यातील पंचनपूर ओपी भागात ही मोठी घटना घडली. याठिकाणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी 9 आरोपींपैकी एकाला अटक केली आहे.

हत्या करून आरोपी फरार : पंचनपूर ओपीच्या टेपा गावात मिथिलेश प्रसाद यांच्या घरी काही लोक होळी खेळण्यासाठी आले होते. मिथिलेश प्रसाद यांनी होळी खेळण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. सध्या सर्वजण फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गावात मात्र शोकळा पसरली आहे. गावातील सर्व ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंचनपूर ओपीमध्ये एफआयआर दाखल : हत्ये प्रकरणी मिथिलेश प्रसाद यांनी पंचनपूर ओपीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये सहा जणांची नावे दिली आहेत. तीन अज्ञातांना आरोपी म्हणून सांगण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पंचनपूर ओ.पी.चे पोलीस कारवाई करत आहेत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गयाचे एसएसपी आशिष भारती यांनी धटनेचे गांभीर्य घेऊन पंचनपूर ओपी, टिकरी पोलिस स्टेशनच्या पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तात्काळ घटनेचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत.

दरियापूर टेपा येथून एका आरोपीला अटक : अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एसएसपीच्या सूचनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले. यात एक आरोपी विनय सिंगला अटक करण्यात आली आहे. त्याला दरियापूर टेपा परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अज्ञात पाच आरोपी फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या पथकाकडून छापेमारी सुरू आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण : घटनेची अधिक माहिती देताना गयाचे एसएसपी आशिष भारती यांनी सांगितले की, पंचनपूर ओपी अंतर्गत असलेल्या टेपा गावात होळीच्या निमित्ताने होळी खेळण्यास नकार दिल्याने मिथिलेश प्रसाद यांच्या अल्पवयीन मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी विनय सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांचे छापेमारी सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.

हेही वाचा : VIDEO दारूगोळा-बंदूकांची होळी पाहिलीये का कधी? पाहा राजस्थानमधील होळीचा हा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.