मुंबई : एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय हा आपल्या देशाचा समृद्ध वारसा आहे असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur visited National Museum of Indian Cinema ) यांनी व्यक्त केले. ठाकूर यांनी आज मुंबईतील एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला त्यांनी भेट दिली, तेव्हा ते बोलत होते.
-
Maharashtra | Information & Broadcasting Minister Anurag Thakur visited Gulshan Mahal National Museum of Indian Cinema in Mumbai
— ANI (@ANI) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"This is a heritage of India, every person should visit this place,especially those who are interested in films and Indian cinema," the minister said pic.twitter.com/uIK8USVrUm
">Maharashtra | Information & Broadcasting Minister Anurag Thakur visited Gulshan Mahal National Museum of Indian Cinema in Mumbai
— ANI (@ANI) April 21, 2022
"This is a heritage of India, every person should visit this place,especially those who are interested in films and Indian cinema," the minister said pic.twitter.com/uIK8USVrUmMaharashtra | Information & Broadcasting Minister Anurag Thakur visited Gulshan Mahal National Museum of Indian Cinema in Mumbai
— ANI (@ANI) April 21, 2022
"This is a heritage of India, every person should visit this place,especially those who are interested in films and Indian cinema," the minister said pic.twitter.com/uIK8USVrUm
सिनेमा ही भारताची शक्ती आहे. ही जगभरातील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करते, असेही ते म्हणाले. मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांनी भारताची ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ठाकूर यांनी केले आवाहन
भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातील विविध विभागांना भेट दिली. तर गेल्या शंभर वर्षातील चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि तंत्रज्ञानात झालेले बदल पाहायला मिळतील असे सांगितले. त्यांनी प्रत्येक व्यक्तीने या संग्रहालयाला भेट द्यावी असेही आवाहन यावेळी केले. मुंबईत असताना एनएमआयसीला भेट दिली नाही तर मुंबईची भेट अपूर्ण राहील, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
आठ एकरवर पसरलेल्या गुलशन महल या इमारतीत विविध आकाराच्या आठ खोल्यांत हे प्रदर्शन पसरलेले आहे. या संग्रहालयात मूक चित्रपटांपासून ते नव्या चित्रपटांपर्यंतच्या इतिहास पाहण्यास मिळतो.चित्रपटात वापरलेल्या वस्तू, जुनी उपकरणे, पोस्टर्स, महत्वाच्या चित्रपटांच्या प्रति, प्रसिद्धी पत्रके, ध्वनीफिती, ट्रेलर्स, ट्रान्सपरन्सी, जुनी चित्रपट मासिके, चित्रपट निर्मिती आणि वितरणाविषयीची माहिती यात प्रदर्शित करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटांचा इतिहासही प्रदर्शित करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा
चित्रपट विभाग, एनएमआयसी, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसेच एनएफडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. आगामी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (एमआयएफएफ) तयारीबाबतही केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा केली.
हेही वाचा - Social Harmony in Karnatak : सहा वर्षाच्या मुलीचा रोजानिमित्त उपवास; हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक