ETV Bharat / bharat

Chardham Yatra 2023 : चारधाम यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी, हवामान विभागाने जारी केला यलो आणि ऑरेंज अलर्ट - केदारनाथ

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेकरूंना येत्या काही दिवसांत हवामानाच्या बदलाचा सामना करावा लागू शकतो. पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

chardham yatra weather
चारधाम यात्रा हवामान
author img

By

Published : Apr 28, 2023, 4:08 PM IST

जिल्हाधिकारी मयूर दीक्षित

डेहराडून (उत्तराखंड) : चारधामच्या यात्रेकरूंसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा उत्साहात सुरू असताना, हवामानाची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढू शकतात. बद्रीनाथ धाममध्ये सतत पाऊस आणि केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी होत आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने 28 आणि 29 एप्रिल रोजी पाऊस, गारपीट, विजांचा कडकडाट आणि हिमवृष्टीसह यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच 30 एप्रिल आणि 1 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन : बद्रीनाथ धाममध्ये आदल्या दिवशी जोरदार पाऊस झाला. तर केदारनाथमध्येही बर्फवृष्टीनंतर तापमानात घट झाली आहे. सकाळच्या वेळी हवामानात प्रत्येक क्षणी बदल होत असून आकाशात ढग दाटून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना हवामानाची माहिती घेऊन पुढील प्रवासाला जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे, हवामानाचे स्वरूप पाहता, रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, खराब हवामान पाहता चारधाम यात्रेकरूंनी त्यांचा प्रवास आठवडाभर पुढे ढकलावा.

यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी : मयूर दीक्षित पुढे म्हणाले की, जर प्रवाशांनी ऑनलाइन नोंदणी केली असेल तर त्यांना लगेच ऑफलाइन नोंदणीची सुविधा दिली जाईल. तसेच हवामानाचे बदलते रुप पाहता दुपारी एक वाजेनंतर प्रवाशांना गौरीकुंडाच्या पलीकडे जाण्यास मज्जाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आज आणि उद्या पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन उत्तराखंड हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच विभागाने 30 एप्रिल आणि 1 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रवाशांना प्रत्येक सुविधा देण्याचा दावा सरकार करत असताना केदारनाथ मार्गावर प्रसाधनगृहांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा : Operation Kaveri: सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'; 256 भारतीयांना घेऊन दुसरे विमान पोहोचले मुंबईत

etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.