ETV Bharat / bharat

Satyapal Malik on Vice president : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे उपराष्ट्रपती पदाबाबत मोठे वक्तव्य

author img

By

Published : Sep 11, 2022, 2:16 PM IST

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ ( Satyapal Malik Statement on Vice president post ) यांच्या बद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, धनखड़ योग्य उमेदवार होते, म्हणून त्यांना उपराष्ट्रपति केले. मलाही उपराष्ट्रपती पदाची संधी होती मात्र, मी नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

Satyapal Malik
Satyapal Malik

झुंझुनू - मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक Meghalaya Governor Satpal Malik यांनी आपल्या वक्तव्यावरुन 'राजकीय बॉम्ब' फोडला आहे. नागौर जिल्ह्यातील लाडनून येथे जात असताना झुंझुनूच्या बगाड येथील हॉटेलमध्ये मलिक यांनी जगदीप धनखर यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ते योग्य उमेदवार आहेत, म्हणून त्यांना उपराष्ट्रपती Satyapal Malik Statement on Vice president post केले. मलाही या पदासाठी संधी होती मात्र, पण मी नकार दिला होता असे वक्तव्य त्यांनी केले. मी सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेन, असेही राज्यपाल मलिक Satpal Malik म्हणाले.

मलिक यांचे उपराष्ट्रपती पदाबाबत मोठे वक्तव्य

शेतकऱ्यांना पाठिंबा - राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता एमएसपीची मागणी पूर्ण होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना मोठे आंदोलन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांचा आवाज नेहमीच उठवणार असल्याचे ते म्हणाले. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही मी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहिल, जिथे जिथे शेतकऱ्यांसाठी लढा द्यावा लागेल त्या ठीकाणी माझा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

सत्यपाल मलिक यांचे मोठे वक्तव्य - यादरम्यान, मलिक यांनी देशातील ईडीच्या कारवाईबद्दल सांगितले की, ईडीने काही भाजप नेत्यांवर ( ED should conduct raids on BJP leaders ) छापे देखील टाकले पाहिजेत. जेणेकरून एकतर्फी कारवाई केली जात नाही असा संदेश लोकांना जाईल. राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्यावर ते म्हणाले की, राजपथ हे नाव अधिक चांगले आहे. बोलण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी देखील सोपे होते मात्र, पंतप्रधानांनी योग्य निर्णय घेतल्याची माहीती त्यांनी माध्यमांना दिली.

अदानी यांच्या संपत्तीत वाढ - राज्यपालांनी आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती अदानी यांच्याबाबतही मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, उद्योगपती अदानी यांच्या संपत्तीत वाढ होत आहे मात्र, शेतकऱ्यांच्या संपत्तीत कोणतीही वाढ होत नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यपाल मलिक यांचे आगमन होताच भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मणसिंग कुडी, एसपी मृदुल कछावा यांनीही स्वागत केले. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.