पुंछ (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. तसेच ग्रेनेडने जोरदार हल्ला केला. यामुळे वाहनाला भीषण आग लागली. यात पाच जवान शहीद झाले आहेत. सुरुवातीला ही आग इतर अन्य कारणांमुळे लागल्याची शक्यता होता. मात्र, आता हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
The troops were part of a convoy that came under attack by terrorists in J&K's Poonch: Army sources https://t.co/UG2QOjbzJk
— ANI (@ANI) April 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The troops were part of a convoy that came under attack by terrorists in J&K's Poonch: Army sources https://t.co/UG2QOjbzJk
— ANI (@ANI) April 20, 2023The troops were part of a convoy that came under attack by terrorists in J&K's Poonch: Army sources https://t.co/UG2QOjbzJk
— ANI (@ANI) April 20, 2023
सर्च ऑपरेशन सुरू - दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यानंतर लागलेली आग एवढी भीषण होती की, जवानांना बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचवेळी वाहनामध्ये किती जवान होते याची माहिती घेतली जात आहे. सध्या या भागात लष्कर व पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
राजनाथ सिंहांनी घेतली माहिती - लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांना गुरुवारी जोरदार ग्रेनेड हल्ला केला. यात पाच जवान शहीद झाले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली आहे. सिंह यांनी याबाबतची सविस्तर माहिती लष्करप्रमुखांकडून घेतली आहे.
-
Defence Minister Rajnath Singh has been briefed by Army Chief General Manoj Pande about the death of five soldiers in a terrorist attack in the Poonch sector of J&K today. The Indian Army troops on the ground are keeping a watch on the situation and taking appropriate action:… pic.twitter.com/5nxbOvEtoL
— ANI (@ANI) April 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Defence Minister Rajnath Singh has been briefed by Army Chief General Manoj Pande about the death of five soldiers in a terrorist attack in the Poonch sector of J&K today. The Indian Army troops on the ground are keeping a watch on the situation and taking appropriate action:… pic.twitter.com/5nxbOvEtoL
— ANI (@ANI) April 20, 2023Defence Minister Rajnath Singh has been briefed by Army Chief General Manoj Pande about the death of five soldiers in a terrorist attack in the Poonch sector of J&K today. The Indian Army troops on the ground are keeping a watch on the situation and taking appropriate action:… pic.twitter.com/5nxbOvEtoL
— ANI (@ANI) April 20, 2023
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता : घटनास्थळावरून पाच जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचवेळी इतर जवानांचा शोध लागू शकला नाही. हा दहशतवादी हल्ला पुंछमधील भाटा धुरियन भागातील महामार्गावर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरुवातीला वीज पडल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हा दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
-
#WATCH | Drone surveillance and search operation underway in the area where terrorists fired on an Indian Army truck in J&K's Poonch
— ANI (@ANI) April 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
5 Army soldiers lost their lives, one injured hospitalised
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/4VWNblD4oz
">#WATCH | Drone surveillance and search operation underway in the area where terrorists fired on an Indian Army truck in J&K's Poonch
— ANI (@ANI) April 20, 2023
5 Army soldiers lost their lives, one injured hospitalised
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/4VWNblD4oz#WATCH | Drone surveillance and search operation underway in the area where terrorists fired on an Indian Army truck in J&K's Poonch
— ANI (@ANI) April 20, 2023
5 Army soldiers lost their lives, one injured hospitalised
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/4VWNblD4oz
गेल्या वर्षीही झाला होता अपघात : गेल्या वर्षी मे महिन्यात लडाखमध्ये लष्कराचे एक वाहन नदीत पडले होते. त्यावेळी झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या 7 जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. याशिवाय या अपघातात अनेक जवान जखमी झाले होते. पण गुरुवारी (20 एप्रिल) पूंछमध्ये झालेली घटना हा दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले आहे.