नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेतली. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती आणि सतत छातीत दाब येत असल्याची तक्रार होती. यानंतर त्यांना तत्काळ एम्सच्या सीएन टॉवरमध्ये दाखल करण्यात आले होते.
आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती घेतली. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी, यासाठी प्रार्थना करतो, असे टि्वट सिंग यांची भेट घेतल्यानंतर मांडवीय यांनी केले आहे.
-
आज पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी से AIIMS, नई दिल्ली में मुलाक़ात की व उनके स्वास्थ्य के विषय में जानकारी ली।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मैं उनके शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं।
">आज पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी से AIIMS, नई दिल्ली में मुलाक़ात की व उनके स्वास्थ्य के विषय में जानकारी ली।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 14, 2021
मैं उनके शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं।आज पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी से AIIMS, नई दिल्ली में मुलाक़ात की व उनके स्वास्थ्य के विषय में जानकारी ली।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 14, 2021
मैं उनके शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं।
एम्समध्ये सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. एम्स रुग्णालय डॉ.मनमोहन सिंग यांच्या तपासासाठी एक मेडिकल टीम बनवली आहे. ज्याचे नेतृत्व एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया करत आहेत. सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना अत्यावश्यक द्रवपदार्थ दिले जात आहेत. सध्या त्यांना निगराणीखील ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना झाली होती कोरोनाची लागण -
डॉ. मनमोहन सिंग, हे 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते. त्यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मनमोहन सिंग यांना साखरेचा त्रास आहे. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली, तर त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया 2009 मध्ये एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही बातमी सतत अपडेट केली जात आहे.
हेही वाचा - वाढदिवस विशेष : मनमोहन सिंगांचे वयाच्या 88 व्या वर्षात पदार्पण, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव