ETV Bharat / bharat

'मन की बात' : मोदींचा 'व्होकल फॉर लोकल'चा नारा; 'नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट' वर भर - मन की बात कार्यक्रमातील मुद्दे

आज 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्साव, व्होकल फॉर लोकल, कोरोना, लसीकरण , जल संरक्षण, टोकियो ऑलिम्पिक, कारगिल विजय दिवस आणि India First वर भाष्य केले.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jul 25, 2021, 12:26 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमात मोदींनी अमृत महोत्साव, व्होकल फॉर लोकल, कोरोना, लसीकरण , जल संरक्षण, टोकियो ऑलिम्पिक, कारगिल विजय दिवस आणि India First वर भाष्य केले. अमृत महोत्सवानिमित्ताने यावेळी “Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे, असे मोदी म्हणाले.

'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे -

पंतप्रधानांनी संबोधनाच्या सुरवातील ऑलिम्पिकवर भाष्य केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना पाहून माझ्यासह संपूर्ण देश रोमांचित झाला. ऑलिम्पिकमध्ये खेळणारे सर्व खेळाडून हे आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करत या क्षणापर्यंत पोहचले आहेत.

‘कारगिल विजय दिवस’ हा सैन्याच्या शौर्य आणि संयमाचा प्रतिक आहे. हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे. सर्वांनी कारगिल युद्धाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मोदींनी देशावासियांना केले.

आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांनाच्या क्षणांचे आपण साक्षीदार होत आहोत. गेल्या 12 मार्चपासून महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून अमृतमहोत्सवाला सुरवात करण्यात आली. देशातील सर्व भागात अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. अमृत महोत्सव हा सरकारचा किंवा कोणत्या पक्षाच कार्यक्रम नाही. तर हा कोट्यवधी भारतवासीयांचा कार्यक्रम असल्याचे मोदींनी म्हटलं.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या प्रकारे झपाटून लोक एकत्र आले. तसेच आपल्याला देशाच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे. लहान-लहान प्रयत्नातून मोठी गोष्ट निर्माण होते. आपल्याला दैनंदिन कामांतून राष्ट्र निर्मितीचे काम करायचे आहे. जसे ‘व्होकल फॉर लोकल’. देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार द्यायाच आहे.

येत्या 7 ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी या राष्ट्रीय हातमाग दिनामागे आहे. 1950 साली स्वदेशी आंदोलनाची सुरवात झाली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना हातमाक व्यवसायीकांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. अमृत महोत्सवानिमित्ताने “Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी जलसंरक्षणावरही भाष्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.