ETV Bharat / bharat

Manipur Violence : 'मिझोरम सोडा, नाहीतर...', मैतेई समुदायाच्या नागरिकांना धमकी; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये - मणिपूर हिंसाचार

मणिपूरमधील हिंसाचारानंतर आता मिझोराममध्ये मैतेई समुदायाच्या लोकांना धमक्या मिळत आहेत. हे लक्षात घेऊन, मिझोरमचे गृह आयुक्त पुह लालेंगमाविया यांनी पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) आणि इतर समुदायांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.

Manipur Violence
मणिपूर हिंसाचार
author img

By

Published : Jul 23, 2023, 3:23 PM IST

Updated : Jul 23, 2023, 3:46 PM IST

ऐजॉल/इंफाळ : मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतरचा हिंसाचार आता इतर राज्यांमध्येही पोहोचू लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिझोरममधील काही बंडखोरांनी मैतेई समुदायाच्या लोकांना मिझोराम सोडण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर मिझोराम सरकारने लगेचच राजधानी ऐजॉलमधील सुरक्षा वाढवली आहे. पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनानंतर हा तणाव वाढला आहे.

मैतेई समुदायाला त्यांच्या सुरक्षेसाठी परत जाण्याची विनंती : या पार्श्वभूमीवर मिझोरमचे गृह आयुक्त पुह लालेंगमाविया यांनी शनिवारी PAMRA आणि मिझो स्टुडंट्स युनियन (MSU) नेत्यांची बैठक घेतली. या संघटनांनी त्यांनी नुकत्याच जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकावर चर्चा केली. या बैठकीत गृह विभाग आणि मिझोरम पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत PAMRA सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. PAMRA नेत्यांनी सांगितले की, मिझोराममधील मैतेई समुदायाला त्यांच्या सुरक्षेसाठी परत जाण्याची विनंती करण्यात आली आहे. मिझो लोकांच्या भल्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

..तर मैतेई स्वत: जबाबदार असतील : ऐजॉल मधील संघटना PAMRA ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, मणिपूरमधील वांशिक संघर्षादरम्यान दोन महिलांच्या नग्न धिंडीमुळे मिझोराममधील तरुणांमध्ये मैतेई समुदायाप्रती संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी मिझोराम सोडावे. PAMRA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूरमधील कुकी समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराने येथील तरुणांच्या भावना दुखावल्या आहेत. मिझोराममध्ये मैतेई समुदायाच्या लोकांसोबत हिंसाचार झाला तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील, असा धमकीवजा इशारा या संघटनेनेने दिला आहे.

मिझोरम सरकारचे सुरक्षेचे आश्वासन : निवेदनात म्हटले आहे की, मिझोराममधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मणिपूरच्या मैतेई लोकांसाठी मिझोराममध्ये राहणे आता सुरक्षित राहिलेले नाही. ही धमकी समोर आल्यानंतर मिझोराम सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, मेईतेई समुदायाच्या सुरक्षेसाठी आधीच पावले उचलली गेली आहेत. वृत्तानुसार, दूरध्वनी संभाषणात मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी आधीच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना मिझोराममधील मैतेई समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मणिपूर सरकार ऐजॉल-इम्फाळ आणि ऐजॉल-सिलचर दरम्यान चालणाऱ्या विशेष एटीआर फ्लाइटद्वारे ऐजॉलमध्ये राहणाऱ्या मैतेई लोकांना बाहेर काढण्याची योजना करत आहे. सध्या या संदर्भात मणिपूर किंवा मिझोराम सरकारकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

  1. West Bengal Violence: मणिपूर पाठोपाठ... पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, दोन महिलांना बेदम मारहाण करून नग्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर
  2. Manipur video : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव, एन बिरेन सिंह म्हणतात..
  3. Manipur Women Parade : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यापूर्वी जमावाने लोकांची घरे जाळली, अनेकांना मारले ठार; एफआयआरमध्ये नोंद

Last Updated : Jul 23, 2023, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.