कर्नाटक - एक मुलगा आपल्या मैत्रिणीला सुटकेसमध्ये ठेऊन हॉस्टेलमधून बाहेर घेऊन जात (female friend out of hostel in suitcase) असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल (CCTV video viral) होत आहे. कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठातील (Manipal Video Viral) हा व्हिडिओ असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. मुलगा आपल्या मैत्रिणीला सूटकेसमध्ये बंद करून घेऊन जात होता. पण चेकींग दरम्यान तो पकडला गेला आणि त्याचा भांडाफोड झाला.
- मणिपाल विद्यापीठाचे स्पष्टीकरण -मणिपल विद्यापीठाचे स्पष्टीकरण
दरम्यान, मणिपाल विद्यापीठाने याबद्दल एक निवेदन जारी केले आहे. त्यात असे सांगितले आहे की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. तो व्हिडओ मणिपाल अकादमीच्या कोणत्याही संस्था/महाविद्यालयांशी संबंधित नाही.
- मैत्रिणीला तो सूटकेसमध्ये लपवून नेत होता -
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो कर्नाटकातील मणिपालचा असल्याचा दावा केला जात आहे. एक विद्यार्थी हॉस्टेलमधून बाहेर पडत असताना मैत्रिणीला तो सूटकेसमध्ये लपवून नेत होता. तेवढ्यात कोणीतरी गार्डला याबद्दलची माहिती दिली. हॉस्टेलच्या गार्डने सुटकेस तपासली असता त्यातून एक मुलगी बाहेर आली. सुटकेसमधून बाहेर पडलेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- गार्डने तपासली सुटकेस -
हॉस्टेलच्या गेटवर सुटकेसबाबत विद्यार्थ्याची चौकशी केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी गेटवर असलेल्या गार्डने विद्यार्थ्याला सुटकेस उघडण्यास सांगितले. विद्यार्थ्याने सुटकेस उघडली आणि त्यातून एक मुलगी बाहेर आली. हा व्हिडिओ २०१९ चा असल्याचा दावा केला जात आहे.