ETV Bharat / bharat

Mangaluru Autorickshaw Blast: ऑटोमधील स्फोट हा अपघात नसून दहशतवादी कृत्य-कर्नाटक पोलीस महासंचालक

author img

By

Published : Nov 20, 2022, 12:57 PM IST

Mangaluru Autorickshaw Blast: कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका ऑटोमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या ऑटोमध्ये झालेला स्फोट अपघात नसून दहशतवादी कृत्य असल्याचं कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सांगितले आहे.

Mangaluru Autorickshaw Blast
Mangaluru Autorickshaw Blast

बेंगळुरू: कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका ऑटोमध्ये स्फोट झाल्यानं मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या ऑटोमध्ये झालेला स्फोट अपघात नसून दहशतवादी कृत्य असल्याचं कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी यावेळी सांगितले आहे.

डीजीपी यांनी या घटनेबद्दल ट्विट केले आहे. आता याची पुष्टी झाली आहे. हा स्फोट अपघाती नसून गंभीर नुकसान करण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्य आहे. कर्नाटक राज्य पोलीस केंद्रीय एजन्सीसह त्याचा सखोल तपास करत आहेत, असे ते यावेळी म्हणाले आहेत. शनिवारी मंगळुरूमध्ये एका चालत्या ऑटोरिक्षाचा स्फोट झाला. ज्यामुळे आग आणि प्रचंड धूर झाला आणि ड्रायव्हर आणि एक प्रवासी भाजलेल्यांमध्ये जखमी झाले आहे. गारोडीजवळ रस्त्यावरून जात असताना शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास एका ऑटोमध्ये स्फोट झाला.

Mangaluru Autorickshaw Blast
Mangaluru Autorickshaw Blast

पोलिसांनी शेअर केलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही व्हिज्युअलमध्ये, किरकोळ स्फोट झाल्यानंतर ऑटोरिक्षाला आग लागल्याचे दिसले. परंतु एका पोलिस अधिकाऱ्याने मात्र हा 'स्फोट' होता की नाही याची पुष्टी केली नाही. शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीनंतर पत्रकारांना सांगितले की ऑटोरिक्षात 'आग' लागली आहे. याला घाबरण्याची गरज नाही. अफवा पसरवण्याविरोधात त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.