ETV Bharat / bharat

प्रार्थनेप्रमाणे तामिळनाडूत डीएमके सत्तेत... ६० वर्षीय समर्थकाची पेटवून घेत आत्महत्या!

उलाकानाथन हे तामिळनाडू जिल्ह्यातील करूरमधील लालापेठ परिसरातील रहिवाशी होते. जर डीएमके विधानसभा निवडणुकीत विजयी झाले तर मनमंगलम येथील नवीन कालीममन मंदिरात आत्मदहनाने जीवन अर्पण करू अशी त्यांनी प्रार्थना केली होती.

author img

By

Published : Jul 9, 2021, 10:33 PM IST

उलाकानाथन
उलाकानाथन

चेन्नई - तामिळनाडूत डीएमके सत्तेत आल्यानंतर डीएमके समर्थकाने स्वखुशीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या समर्थकाने पक्षाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रार्थना केली होती. उलाकानाथन असे आत्महत्या केलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. ते निवृत्त वाहतूक निरीक्षक होते.

उलाकानाथन हे तामिळनाडू जिल्ह्यातील करूरमधील लालापेठ परिसरातील रहिवाशी होते. जर डीएमके विधानसभा निवडणुकीत विजयी झाले तर मनमंगलम येथील नवीन कालीममन मंदिरात आत्मदहनाने जीवन अर्पण करू अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे डीएमकेला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडुचे मुख्यमंत्रिपदी जबाबदारीही घेतली आहे.

उलाकानाथन
उलाकानाथन

हेही वाचा-दिलासादायक! टीसीएस ४० हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून देणार नोकऱ्या

पोलिसांच्या हाती लागले पत्र-

उलाकानाथन यांनी त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी वाट पाहिली. ते शुक्रवारी सकाळी पदुकालीम्मन मंदिरात गेले. पेट्रोल कॅन अंगावर स्वत:ला पेटवून घेतले. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी त्यांना आगीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत पूर्णपणे जळाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. वांगल पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उलाकानाथन यांचे पत्र मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-मध्यप्रदेश : अनुपपूरजवळ मालगाडीचा भीषण अपघात; नदीत कोसळले १२ डबे

काय म्हटले आहे पत्रात?

त्यांनी पत्रात म्हटले, की विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर स्टॅलीन हे मुख्यमंत्री होईल, अशी मी अपेक्षा केली होती. सेथींल बालाजी हे करूर मतदारसंघामधून मंत्री व्हावे, यासाठी मी मनमनमंगलम कालीम्मान मंदिरात प्रार्थना केली होती. ३० हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते सर्व बरे होईपर्यंत वाट पाहिली. प्रार्थनेप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झाल्याने स्वखुशीने मृत्यू स्वीकारत आहे.

दरम्यान, माजी अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने नेटिझन्स टीका करत आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतरही तामिळनाडूत समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.