ETV Bharat / bharat

Mamata Banerjee Injured : हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंग दरम्यान ममता जखमी, पाठीला आणि पायाला दुखापत

author img

By

Published : Jun 27, 2023, 9:20 PM IST

ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यावेळी त्यांना दुखापत झाली. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांनी त्यांना किमान आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Mamata Banerjee Injured
ममता बॅनर्जी जखमी

क्रांती (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरने मंगळवारी खराब हवामानामुळे जलपाईगुडी येथील एअरबेसवर आपत्कालीन लँडिंग केले. मात्र लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर डळमळू लागले. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरताना ममता बॅनर्जींच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्या कोलकात्यात परतल्या आणि थेट एसएसकेएम रुग्णालयात दाखल झाल्या.

ममता घरूनच उपचार घेतील : संध्याकाळी 5.15 वाजता ममता बॅनर्जी एसएसकेएम रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांना चालताना अडचण येत होती. 2021 च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या अपघातामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या लिगामेंटमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना सध्या रुग्णालयातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र ममता बॅनर्जींना रुग्णालयात राहण्याची इच्छा नसल्याची माहिती आहे. त्या सर्व उपचार घरूनच करतील. एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक मोनिमोय बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना पुरेशा विश्रांतीची गरज असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांना किमान आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या : हेलिकॉप्टरच्या आपात्कालीन लॅंडिगबाबत वैमानिकाने सांगितले की, खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर पुढे नेण्यात अडचण येत होती. फक्त दार्जिलिंगचा डोंगराळ भाग स्पष्ट दिसत होता. यामुळे त्यांना हेलिकॉप्टर त्याच दिशेने घेऊन इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यानंतर त्यांनी हेलिकॉप्टर सेवोके एअरबेसवर उतरवले. तेथे लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. पायलटच्या समजूतदारपणामुळे ममता बॅनर्जींसोबत मोठा अपघात टळला. मात्र हेलिकॉप्टरच्या लँडिंगदरम्यान ममतांना दुखापत झाली. इतर प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही. जलपायगुडीच्या क्रांतीमध्ये जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर ममता बागडोगरा येथे रवाना झाल्या होत्या.

हे ही वाचा :

  1. West Bengal Violence : हिंसाचारावर उच्च न्यायालय कठोर, अहवाल मागवला ; ममता म्हणाल्या – विरोधी पक्ष जबाबदार
  2. West Bengal Violence : ममता सरकारला झटका, पंचायत निवडणुकीत केंद्रीय सुरक्षा दलाची तैनाती योग्य - सर्वोच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.