ETV Bharat / bharat

...तर ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागेल! - सुवेंदू अधिकारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणे शक्य नसल्याने तीरथसिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 191 ए चा हवाला दिला आहे. हीच परिस्थिती जर पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली. तर ममता बॅनर्जी यांनाही 4 नोव्हेंबरपर्यंत विधानसभेचे सदस्यत्व न मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागेल.

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jul 3, 2021, 12:54 PM IST

कोलकाता - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणे शक्य नसल्याने तीरथसिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 191 ए चा हवाला दिला आहे. हीच परिस्थिती जर पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली. तर ममता बॅनर्जी यांनाही 4 नोव्हेंबरपर्यंत विधानसभेचे सदस्यत्व न मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागेल.

लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 151 अ नुसार निवडणूक आयोगास संसदेच्या दोन्ही सभागृहातील आणि राज्यातील विधानसभेच्या रिक्त जागा सहा महिन्यांत पोटनिवडणुकीद्वारे भरण्याचे अधिकार आहेत. मात्र, यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ शिल्लक असायला हवा.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनेच्या कलम 164 (4) च्या तरतुदींनुसार 5 मे रोजी मतदारसंघात पराभव झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या तरतुदीत असेही प्रावधान आहे की, सभागृहाचा सदस्य नसलेला मंत्र्याने सलग 6 महिन्यांत विधानसभेचे सदस्यत्व घेण्यास सक्षम नसेल. तर त्या कालावधीनंतर संबंधित व्यक्तीला मंत्री पदाचा लाभ घेता येणार नाही. जर ममता यांनी येत्या सहा महिन्यांच्या आत आमदारकी मिळवली नाही. तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल.

पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी दमदार विजय मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र, ममतांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला. आता ममता यांना सहा महिन्याच्या आत सभागृहाचे सदस्य मिळवणे गरजेचे आहे. यासाठी पश्चिम बंगाल सरकारने राज्यात लवकरात लवकर प्रलंबित असलेल्या पोटनिवडणुका घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे. मात्र, कोरोना महामारी संपेपर्यंत निवडणूक आयोग पोटनिवडणुका तहकूब करण्याची घोषणा करू शकते. तथापि, अद्याप याची खातरजमा झालेली नाही. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी आपली खुर्ची कशी वाचविणार? हा प्रश्न आहे.

नंदीग्राममध्ये पराभवाचा सामना झाल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर जागेवरुन निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला होता. भवानीपूर हा ममता यांचा पारपांरिक मतदारसंघ आहे. भवानीपूरमधून दीदी गेल्या 11 वर्षांपासून सलग लढत आल्या आहेत. मात्र, यंदा त्यांनी आपला मतदारसंघ बदलला होता. तसेच ममता यांनी नंदीग्राम निवडणूक निकालाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

दीदींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी -

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं होते. नंदीग्राम हा सुवेंदू यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सुवेंदू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हा गडही भाजपाकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले गेले. बॅनर्जी यांनी जानेवारीत नंदीग्राम सीटवरुन निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. सुवेंदू यांनी ममतांचे आव्हान स्वीकारले होते. 50 हजार मतांनी दीदींचा पराभव करू नाहीतर राजकारण सोडून देऊ, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.