ETV Bharat / bharat

मी मोठी गाढव आहे, अधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा ओळखला नाही - ममता बँनर्जी - ममता बँनर्जीं पश्चिम बंगाल निवडणूक

ममता बॅनर्जी यांनी येथील एका निवडणूक रॅलीत अधिकारी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. अधिकारी कुटुंबाने 5 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य निर्माण केले असल्याचे आपल्या कानावर आले आहे, सत्तेत आल्यानंतर याची चौकशी करून घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.

ममता बँनर्जी
ममता बँनर्जी
author img

By

Published : Mar 21, 2021, 7:35 PM IST

कांठी दक्षिण (पश्चिम बंगाल) - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेले नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार सुवेन्दु अधिकारी यांचे वडील शिशीर अधिकारी अखेर आज भाजपमध्ये दाखल झाले. यावर मुख्यमंत्री ममता बँनर्जीं यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून मी मोठी गाढव आहे, अधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा ओळखू शकले नसल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 'टीएमसी'चे खासदार शिशिर अधिकारी यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमने-सामने आहेत. ममता बॅनर्जी यांनी येथील एका निवडणूक रॅलीत अधिकारी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. अधिकारी कुटुंबाने 5 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य निर्माण केले असल्याचे आपल्या कानावर आले आहे, सत्तेत आल्यानंतर याची चौकशी करून घेणार असल्याचे बँनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी अधिकारी कुटुंबाची तुलना मीर जाफर (देशद्रोही) यांच्याशी केली. या मतदारसंघातील लोक यांचा प्रकार सहन करणार नाहीत आणि आपल्या मतांनी त्यावर प्रत्युत्तर देतील. बॅनर्जी भरसभेत म्हणाल्या की, 'मला वाटते की, मी मोठी गाढव (आमी एकता बारा गाढव) आहे, यांचा खरा चेहरा ओळखू शकले नाही. मला माहीत नाही, पण लोक म्हणतात की त्यांचे 'साम्राज्य' 5 हजार कोटी रुपयांचे आहे आणि आता हा पैसा मते खरेदी करण्यासाठी वापरला जाणार आहे. परंतु, मतदारांनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. भाजप हा बदमाश आणि गुंडांचा पक्ष असल्याचेही त्या म्हणाल्या.

शिशीर अधिकारींचा जय श्रीरामचा नारा

सध्य परिस्थितीत जिल्ह्यात राजकीय वर्चस्व असलेल्या अधिकारी कुटुंबातील बहुतेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काहीजण अजून भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आज भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर टीएमसीचे ज्येष्ठ खासदार शिशीर अधिकारी यांनी भारत माता की जय आणि जय श्रीराम अशी घोषणाबाजी केली. तृणमूलमध्ये जागा मिळवण्यासाठी आपण खूप मेहनत केली. परंतु, ज्या पद्धतीने मला आणि माझ्या मुलांना वागणूक मिळाली त्यामुळे आम्हाला पक्ष बदलणे भाग पडले, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.