आगरतळा: वन अधिकाऱ्यांनी (Forest Officer) सांगितलेकी, “आज सकाळी आमच्या फील्ड स्टाफमार्फत आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि उपविभागीय प्रभारी आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांसह घटनास्थळी धाव घेतली” पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हत्तीच्या बछड्याची तपासणी केली. या बछड्याचा मृत्यू ( Elephant Calf Died) हा विज पडल्यामुळे झाला. कारण त्याच्या अंगावर कोणत्याही बाह्य जखमा किंवा इतर कोणत्याही दुखापतीची इतर लक्षणे नव्हती. त्याच्या कानात रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्याचा मृत्यू वीज पडून झाल्याचे सिद्ध झाले आहे.
Elephant Calf Died : त्रिपुराच्या जंगलात वीज पडून नर हत्तीच्या बछड्याचा मृत्यू - वन अधिकारी
त्रिपुराच्या खोवाई जिल्ह्यांतर्गत तुलसीगड वन परिक्षेत्रात (Tripura forest) काल रात्री उशिरा एका नर हत्तीचा वीज पडून मृत्यू ( Elephant Calf Died) झाला. ईटीव्ही भारतशी बोलताना, जिल्हा वन अधिकारी (Forest Officer) रघुल गेशन बी यांनी दावा केला की हत्तीच्या बछड्याचा वीज पडून मृत्यू झाला.